vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जालना–वाटूर महामार्गावरील अतिक्रमणे हटविलीविरेगाव, चितळपुतळी फाटा परिसरात प्रशासनाची कारवाई

जालना–वाटूर महामार्गावरील अतिक्रमणे हटविलीविरेगाव, चितळपुतळी फाटा परिसरात प्रशासनाची कारवाई

 

जालना, प्रतिनिधी: जालना-वाटूर राष्ट्रीय महामार्गावरील विरेगाव आणि चितळपुतळी फाटा परिसरात महामार्गाच्या हद्दीत करण्यात आलेली अतिक्रमणे प्रशासनाने हटविली. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग, मोजपुरी पोलीस ठाणे तसेच कल्याण टोलवेजचे अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.

महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, वाहनचालक व नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने ही अतिक्रमणे हटविण्यात आली. कारवाईपूर्वी संबंधित अतिक्रमणधारकांना नियमानुसार आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे हटविण्यात आली.

या कारवाईमुळे जालना–वाटूर महामार्गावरील वाहतुकीला अधिक मोकळीक मिळण्यास तसेच वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे. महामार्गाच्या हद्दीत अनधिकृत अतिक्रमण किंवा बांधकाम करू नये आणि सार्वजनिक वाहतूक व सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

सामाजिक समता सप्ताह उत्साहात-स्वाधार व ट्रॅक्टर योजनेच्या लाभार्थ्यांना पत्राचे वाटप

बुलढाणा जिल्ह्यात ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा होणार शुभारंभ!७ मार्चपासून ते १५ मे २०२६ पर्यंत चालणार अभियान!

आपले गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने काम करावे -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर,सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ विभागीय कार्यशाळेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मृत विद्यार्थ्यांच्या परिवारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत… वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिवारांना आर्थिक दिलासा आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्र्याकडे केली होती मदतीची मागणी

एकमेकांच्या हातात हात घालून दुष्काळावर मात करूया- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – बालगाव आश्रमात शेतकऱ्यांसोबत केला दिवाळी फराळ- शेतकऱ्यांच्या सुख दुःखात शासन पाठीशी असल्याचा दिला विश्वास- ⁠शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन केले फराळ वाटप

vishwatmaklokswamivarta

विनापरवाना ड्रोन उडवणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल – नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन