vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांची संवेदनशीलता; आठ बालकांच्या पुनर्वसनासाठी विशेष पुढाकार- • ‘मला मोठेपणी कलेक्टर व्हायचंय!’ म्हणणाऱ्या चिमुकल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले स्वप्नपूर्तीचे बळ• बालकांच्या सुरक्षित, प्रेमळ कुटुंबात जाण्याचा मार्ग मोकळा

जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांची संवेदनशीलता; आठ बालकांच्या पुनर्वसनासाठी विशेष पुढाकार- • ‘मला मोठेपणी कलेक्टर व्हायचंय!’ म्हणणाऱ्या चिमुकल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले स्वप्नपूर्तीचे बळ• बालकांच्या सुरक्षित, प्रेमळ कुटुंबात जाण्याचा मार्ग मोकळा

 

बुलढाणा, प्रतिनिधी बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि हक्काचे कौटुंबिक वातावरण मिळावे, या संवेदनशील भूमिकेतून जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी जिल्ह्यातील दत्तकविधान प्रक्रियेंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा विशेष आढावा घेतला. त्यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही पूर्ण केल्याने दत्तकविधानातील आठ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या प्रक्रियेमुळे आठ बालकांना सुरक्षित व प्रेमळ कुटुंबाचे छत्र मिळण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.

दत्तकविधान प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार एकूण आठ प्रकरणांमध्ये संबंधित पालकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये संस्थांतर्गत दोन, सावत्र दत्तकविधानाची दोन आणि नातेवाईकांमार्फत दत्तकविधानाची चार प्रकरणे समाविष्ट आहेत. या सर्व प्रकरणांच्या अनुषंगाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.‘मला मोठेपणी कलेक्टर व्हायचंय!’; चिमुकल्याच्या स्वप्नाला जिल्हाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन,या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान घडलेला एक प्रसंग उपस्थितांच्या मनाला भावून गेला. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी संवादादरम्यान एका चिमुकल्याला सहज विचारले, “तुला मोठेपणी काय व्हायचे आहे?” त्यावर त्या बालकाने क्षणाचाही विलंब न करता आत्मविश्वासाने उत्तर दिले, “मला कलेक्टर व्हायचंय!”

बालकाच्या या निरागस आणि आत्मविश्वासपूर्ण उत्तराने जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्याच्या स्वप्नातील जिद्द आणि उत्साह पाहून डॉ. देवरे यांनी त्याला थेट जिल्हाधिकारी पदाच्या खुर्चीवर बसविले. तसेच त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत स्वप्न मोठे ठेवण्याचे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे प्रोत्साहन दिले. एका चिमुकल्याच्या मनातील स्वप्नाला मिळालेली ही प्रेरणा उपस्थितांसाठीही भावनिक आणि प्रेरणादायी ठरली.

दत्तकविधान म्हणजे केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून बालकाला माया, आपुलकी, सुरक्षितता, शिक्षण आणि कुटुंबाचा आधार मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. प्रत्येक बालकाला सन्मानाने जगण्याची, स्वतःची स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. आठ प्रकरणांतील कार्यवाहीमुळे बालकांच्या कौटुंबिक पुनर्वसनाला चालना मिळाली असून, त्यांना सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण उपलब्ध होण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.

या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे, संरक्षण अधिकारी सागर राऊत तसेच दत्तकविधान संस्थेचे (दि लव्ह ट्रस्ट) संस्थापक गजानन कुलकर्णी यांनी समन्वयातून कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले.

संबंधित पोस्ट

धारावीतील एन शिवराज मैदानात 55 वा वृक्ष संवर्धन दिन स्वच्छता अभियान

सर्व शासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ साठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत – पालकमंत्री जयकुमार गोरे

🇮🇳 ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत लक्षद्वीपच्या कवरत्ती बेटावर तिरंगा यात्रेचे आयोजन!

राष्ट्रीय समाज पक्षाने किसान सेल रासपा तालुका अध्यक्ष घनसांगी वैजनाथ केशवराव वायसे यांची नियुक्ती झाली असून महादेव जानकर संस्थापक अध्यक्ष रासपा व शिवलिंग आप्पा किन्नूर राष्ट्रीय अध्यक्ष रासपा यांनी निवड केली याबद्दल वैजनाथ वायसे यांचे समाजात कौतुक..

विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिक, एकात्मिक शहरी विकासाला चालना*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*• व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; उद्योग विभाग व ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार*

निश्चित कालमर्यादेत महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी,जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्ग अतिक्रमणमुक्त करण्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे निर्देश,मिशन मोडवर कार्यवाही; अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देण्याचे आदेश..