vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जुहू चौपाटी येथे आयोजित भव्य छठपूजा-भारतीय सण आणि उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुहू चौपाटी येथे आयोजित भव्य छठपूजा-भारतीय सण आणि उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, प्रतिनिधी भारतीय सण आणि उत्सव हे आपल्या प्राचीन आणि सनातन संस्कृतीचा आविष्कार आहेत. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

जुहू चौपाटी येथे आयोजित भव्य छठपूजा महोत्सवात सहभागी होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित भाविकांना छठपर्वाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार अमित साटम, माजी आमदार कृपाशंकर सिंह, छठपूजेचे आयोजक मोहन मिश्रा, दिवाकर मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

 

छठपूजेच्या निमित्ताने भक्तीचा महासागर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छठपूजेच्या निमित्ताने जुहू चौपाटीवर आज पाण्याचा अथांग सागर आणि भक्तांचा महासागर असे दोन सागर एकाच वेळी पाहायला मिळत आहेत. सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करण्यासाठी आणि छठी मैयाचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक श्रद्धेने एकत्र आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत असून त्याच्या प्रकाशामुळेच सृष्टीतील जीवसृष्टी आणि वनस्पतींचे जीवन शक्य होते. मानवी जीवन, शेती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी सूर्यनारायणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा छठपर्व हा महत्त्वाचा उत्सव आहे. या पूजेत मावळत्या आणि उगवत्या अशा दोन्ही सूर्यांना अर्घ्य दिले जाते. सूर्यनारायण, जल आणि छठी मैया कोणताही भेदभाव करत नाहीत. जात, धर्म, भाषा, प्रांत किंवा आर्थिक परिस्थिती यांचा विचार न करता श्रद्धेने अर्घ्य अर्पण करणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद मिळतो, ही या पर्वाची व्यापक शिकवण आहे.छठव्रती महिलांसाठी कायमस्वरूपी सुविधांची व्यवस्था

छठपूजेच्या आयोजनाबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, २०१४ पासून छठव्रती माता-भगिनींच्या सुरक्षिततेसह त्यांच्या सोयी-सुविधांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. निर्जला व्रत करणाऱ्या महिला रात्रीच्या वेळीही पूजेसाठी चौपाटीवर उपस्थित असतात. त्यांची सुरक्षितता आणि आवश्यक सुविधांची काळजी घेणारी कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्यात आली आहे.

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न – अमित साटम

 

यावेळी आमदार अमित साटम यांनी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. मुंबईतील नदी-नाल्यांमधून प्रक्रिया न करता सांडपाणी समुद्रात सोडले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात राष्ट्रीय हरित लवादाकडे पाठपुरावा करून सांडपाणी विसर्गासाठी आवश्यक निकष निश्चित करून घेतल्याचे त्यांनी सांगितले.

 

मुंबईत सध्या सात ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची कामे सुरू असून, त्यामुळे प्रक्रिया केलेले सांडपाणीच समुद्रात सोडण्यास मदत होणार आहे. जुहू चौपाटीसह मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आमदार साटम यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

कोकण विभागातील पहिला ‘अमृत आनंद मेळा वरसोली अलिबाग येथे उत्साहात संपन्न

🎓📚 भामरागड प्रकल्पातील 26 विद्यार्थ्यांची निट-जेईई विशेष प्रशिक्षणासाठी निवड आदिवासी विकास विभागाचा पुढाकार; फिझिक्सवाला मार्फत दोन वर्षांचे मोफत निवासी प्रशिक्षण.. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाची नवी संधी…

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्मृतीपत्रे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द

कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्रात पुढील आठवडाभर पावसाचा जोर

कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल)आस्थापनांना नियमावली जारी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक

टाईमलाईन’ समाजात सकारात्मकता पेरणारे पुस्तक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्या ‘टाईमलाईन’ पुस्तकाचे प्रकाशन