vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार’ व ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम’ योजनांची नूतनीकरण प्रक्रिया सुरू पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश नूतनीकरण अर्ज सादर करावेत

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार’ व ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम’ योजनांची नूतनीकरण प्रक्रिया सुरू

पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश नूतनीकरण अर्ज सादर करावेत

मुंबई, प्रतिनिधी : मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यातील ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ आणि ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ यांचा लाभ घेणाऱ्या विद्यमान विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश नूतनीकरणाचे ऑफलाइन अर्ज २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर आणि उपनगर कार्यालयाने केले आहे.

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या; मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ राबविण्यात येते. तसेच भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ राबविण्यात येते.

मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये या योजनांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नूतनीकरण प्रक्रियेची माहिती देण्याचे आणि महाविद्यालयाच्या सूचना फलकावर त्याबाबत सूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही पात्र विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी ऑफलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत आणि आवश्यक कागदपत्रांची एक प्रत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर, उपनगर नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, आर. सी. चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००७१ येथे जमा करावी, असे आवाहन सहायक संचालक रविकिरण मलकूनाईक, मयूरी कदम यांनी केले आहे.

 

000

संबंधित पोस्ट

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ : प्रतीक्षाधीन यादीतील तिसऱ्या फेरीस प्रारंभ

राज्यातील महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत सुलभपणे पोहोचावी या उद्देशाने महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात एकात्मिक बाल विकास सेवा (#आयसीडीएस) योजनेच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण

आज गेट ऑफ इंडिया ते यशवंतराव चव्हाण सेंटरपर्यंत व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे या दिंडीला हिरवा झेंडा दाखवला.

vishwatmaklokswamivarta

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय.

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील नागरिकांनी ‘स्व-गणना’ करावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन*1 मे पासून डिजिटल जनगणनेला सुरुवात..

राज्यात ऑर्केस्ट्रा बारच्या नावावर डान्सबार चालवले जात असल्याच्या तक्रारींची तपासणी करणार