vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

AIR Rising Stars  युवा आकाशवाणी संगीत संमेलनाचे आयोजन

AIR Rising Stars  युवा आकाशवाणी संगीत संमेलनाचे आयोजन

राज्य प्रतिनिधी

उद्या, बुधवार दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता बालगंधर्व नाट्यगृह, मिरज येथे AIR Rising Stars अर्थात युवा आकाशवाणी संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सांगली कोल्हापूर जिल्हयातील ३० वर्षांपर्यंतच्या मान्यताप्राप्त आकाशवाणी कलाकारांचा सहभाग असलेल्या या विशेष संगीतमय मैफिलीबद्दल रसिकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले आहे.

भारतातील एकूण २६ केंद्रांवर होणाऱ्या या कार्यक्रम मालिकेतील महाराष्ट्रातील पहिलाच कार्यक्रम मिरज येथे होत असून त्याच्या संयोजनाची संधी आकाशवाणी सांगली केंद्राला मिळाली आहे. याबद्दल सर्वत्र आकाशवाणी सांगली केंद्राचे अभिनंदन आणि उपक्रमाचे स्वागत होत आहे.

कलाकारांविषयी:अर्णव बुवा (गडहिंग्लज): तरुण, तडफदार आणि समाजमाध्यमावर प्रचंड लोकप्रिय असलेला शास्त्रीय गायक. मिरजेतील अंबाबाई नवरात्र महोत्सवात त्याच्या गायकीने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. तो या मैफिलीत कोणते राग सादर करणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

अभिषेक तेलंग (सांगली): सुगम गायनाबरोबरच आता चित्रपट पार्श्वगायन क्षेत्रात दमदारपणे उतरलेला, सुरेल व भरदार आवाजाचा गायक. आकाशवाणी संगीत स्पर्धेचा विजेता असलेला अभिषेक सुगम संगीताची वैविध्यपूर्ण रूपे सादर करणार आहे.

श्रद्धा जोशी-दांडेकर (मिरज): नाट्यसंगीत सादर करणारी मिरजेतील कलावंत. राज्य नाट्यसंगीत महोत्सवात आपल्या खड्या व पल्लेदार आवाजाची छाप उमटवणारी श्रद्धा नाट्यगीतांच्या अनेक छटा दाखवेल.

शफाअत नदाफ: आकाशवाणीतील दिवंगत टॉप ग्रेड सतारवादक रफिक नदाफ यांचा मुलगा, बी हाय ग्रेड मान्यताप्राप्त कलाकार. विख्यात सतारवादक उस्ताद शाहीद परवेज यांचा शिष्य. त्याचा सहभाग लक्षणीय ठरणार आहे.

तनय कामत (कोल्हापूर): बासरीवादक, पंडित रूपक कुलकर्णी यांचा शिष्य. शफाअत नदाफ बरोबर त्याची जुगलबंदी या मैफिलीचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

प्रतीक्षा पोवार (कोल्हापूर): नव्या दमाची गायिका, प्रथमच मिरजेच्या रंगमंचावर सुगम गायन सादर करणार आहे. तिने निवडलेली काही नवीन गीते रसिकांना नवनिर्मितीचा आस्वाद देतील.

साथ-संगत करणारे वादक:सारंग सांभारे: पंडित तुळशीदास बोरकर यांचे शिष्य, हार्मोनियम व ऑर्गन वादक. आयटी क्षेत्रातील दगदगीची नोकरी सांभाळून देशभरातील मोठ्या कार्यक्रमांत साथ करणारा सारंग कौतुकाचा विषय ठरला आहेऋतुराज धुपकर (कोल्हापूर): पदार्पणातच आकाशवाणीच्या स्वरचाचणीत बी हाय दर्जा मिळवलेला हार्मोनियम व कीबोर्ड वादक. रघुनाथ धुपकर, डॉ. सुधांश कुलकर्णी, डॉ. चैतन्य कुंटे यांचे मार्गदर्शन लाभलेले वादक.

शौनक भोगले व सुमित शेडबाळे (मिरज): मिरजेतील ज्येष्ठ तबलावादक जितेंद्र भोसले यांचे शिष्य. त्यांची तबला व तालवाद्य साथ विशेष रंग भरणार आहे.सूत्रसंचालन: मिरजेतील उदयोन्मुख निवेदिका आकांक्षा जोशी करणार असून तिने यापूर्वी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे व दूरदर्शन कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.

नवीन पिढीतील सर्वच कलावंत आपल्या सांगीतिक गुणवत्तेमुळे समाजमाध्यमांवर लोकप्रिय असून मिरजेतील संगीत रसिक त्यांचा कलाविष्कार पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांना प्रवेश खुला आहे. सांगली कोल्हापुरातील युवा कलावंतांना व्यासपीठ देण्याच्या आकाशवाणीच्या या उपक्रमाला रसिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आकाशवाणीच्या वतीने करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

पु. ल. कट्ट्यावर ७ ऑगस्टला विजयाबाईंच्या आठवणींचा जागर

vishwatmaklokswamivarta

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट महामंडळानं मुंबईत ब्रिक्स वेव्हज बाजारचं केलं आयोजन.

मिफ्फ-2026 निमित्त फिल्मसिटीकडून मराठी लघुपट व माहितीपटांचे आयोजन

१२ एप्रिल रोजी ठाण्यात `स्वरप्रभात’ मध्ये बासरी आणि सुंद्री वादन जुगलबंदी, रोजी दत्त पंडीत यांचे गायन*रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य *

vishwatmaklokswamivarta

६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाच्या विभागीय पारितोषिक वितरण सोहळ्यात रंगकर्मींचा होणार सन्मान३० जून रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे हौशी मराठी नाट्य, बालनाट्य व प्रथम मराठी एकांकिका स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांचा गौरव

गडचिरोलीतील ‘अजब-गजब विचार मंच’च्या वतीने यंदाही ‘संगीत महोत्सव २०२६ (पर्व – १३)’ चे आयोजन

vishwatmaklokswamivarta