vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई शहर जिल्ह्यात ‘बाल अधिकार सप्ताह २०२६’ चा उत्साहात शुभारंभ; प्रमुख रेल्वे स्थानकांवर बालकांसोबत बालदिन साजरा

मुंबई शहर जिल्ह्यात ‘बाल अधिकार सप्ताह २०२६’ चा उत्साहात शुभारंभ; प्रमुख रेल्वे स्थानकांवर बालकांसोबत बालदिन साजरा

मुंबई प्रतिनिधी

मुंबई, : संयुक्त राष्ट्रसंघाने २० नोव्हेंबर १९८९ रोजी बालहक्क संहिता स्वीकारली असून या ऐतिहासिक निर्णयास यंदा ३७ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त बालकांचे हक्क आणि सुरक्षितता याबाबत समाजामध्ये व्यापक जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी संपूर्ण राज्यात दिनांक १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ दरम्यान ‘बाल अधिकार सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.

 

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती शोभा शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्प लाईन (जिल्हा व रेल्वे), मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने काल (दि. १४ नोव्हेंबर २०२६) बालदिनाचे औचित्य साधून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि मुंबई सेंट्रल या प्रमुख रेल्वे स्थानकांवर ‘बाल अधिकार सप्ताहाचे’ उद्घाटन व बालदिन साजरीकरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाकार्यक्रमात रेल्वे स्थानक परिसरात आढळणाऱ्या व प्रवासादरम्यान उपस्थित असलेल्या बालकांना एकत्रित करून त्यांचे गुलाबाचे फूल आणि चॉकलेट देऊन स्वागत – सत्कार करण्यात आला. तसेच बालकांच्या हस्ते केक कापून बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित बालके, त्यांचे पालक व रेल्वे प्रवाशांना बालकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या शासकीय यंत्रणांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. कोणत्याही संकटात किंवा असुरक्षित अवस्थेत सापडलेल्या बालकांच्या तात्काळ मदतीसाठी २४x७ कार्यरत असणाऱ्या चाइल्ड हेल्प लाईन क्रमांक १०९८ आणि आपत्कालीन पोलीस मदत क्रमांक ११२ बाबत जनजागृती करण्यात आली.

दिनांक १४ ते २० नोव्हेंबर २०२६ या संपूर्ण सप्ताहादरम्यान मुंबई शहर जिल्ह्यात विविध रेल्वे स्थानके, पोलीस ठाणी, शाळा, रुग्णालये आणि वस्तीस्तरावर स्वाक्षरी मोहीम, जनजागृती रॅली, सेल्फी फ्रेम, पथनाट्य, फ्लॅशमॉब आणि माहिती पत्रिका वाटप यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्प लाईन (जिल्हा व रेल्वे) टीम, संबंधित रेल्वे स्थानकांचे स्टेशन मॅनेजर, लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल तसेच स्वयंसेवी संस्था ‘रेल्वे चिल्ड्रन्स इंडिया’, ‘मुंबई स्माईल्स’ आणि ‘हमारा फाउंडेशन’ यांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अधिक माहिती व संपर्कासाठी चाइल्ड हेल्प लाईन, मुंबई शहर प्रकल्प समन्वयक नितीन अशोक दिक्षित यांचा मोबाईल क्रमांक 9867175872 तसेच chlmumbaicity@gmail.com या ई-मेल संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

शालेय सहलींतून एसटीला मिळाले १२७ कोटींचे उत्पन्न— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

वेध विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे जिल्हाधिका-यांकडून पूर्वतयारीचा आढावा.

पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कारासह अन्य पुरस्कारांचे वितरण जीवन गौरव पुरस्काराने पद्मश्री सुरेश वाडकर सन्मानित

फटाके फोडल्यामुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ‘तक्रार निवारण यंत्रणा’ कार्यान्वित;उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे स्तरावर संपर्क सुविधा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मीरमधील वार्षिक श्री अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामानामुळे सलग सहा दिवस स्थगित राहिल्यानंतर आज पुन्हा सुरू …

अमरावतीत 19 मे रोजी रोजगार मेळावा;महिंद्र ॲन्ड महिंद्र’ कंपनीत हजार जागांवर प्रधानमंत्री इंटर्नशिपची संधी