vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समता चित्ररथ, संविधान जागृती बाईक रॅली उत्साहात संपन्न

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समता चित्ररथ, संविधान जागृती बाईक रॅली उत्साहात संपन्न

 सांगली, प्रतिनिधी: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 26 जून हा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सांगली शहरात काढण्यात आलेली समता चित्ररथ व संविधान जागृती बाईक रॅली उत्साहात संपन्न झाली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष व पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, सांगली एस.टी स्टँड परिसर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित शासकीय अधिकारी व नागरिकांनी एकत्रितपणे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. तसेच समाजाला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याचा संदेश देत सर्वांनी नशामुक्तीची सामूहिक शपथ घेतली.

संविधान जागृती बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद, भारतीय संविधानाविषयी जनमानसात जागृती निर्माण करण्यासाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली सांगली बसस्थानक परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू होऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महानगरपालिका, सांगली सिटी पोस्ट ऑफिस मार्गे स्टेशन चौक सांगली येथे या रॅलीची सांगता झाली. बाईक रॅलीच्या माध्यमातून संविधानाचा जागर करुन संविधानाच्या माध्यमातून घराघरात समता पोहचविण्याचे कार्य करण्यात येणार असल्याचे यावेळी समाज कल्याण सांगली सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रतिपादन केले.

लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात साहित्याचे वाटप , सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने, या कार्यक्रमात ‘गटई स्टॉल योजना’ आणि ‘मिनी ट्रॅक्टर योजना’ या योजनांतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास समाज कल्याण सांगली सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, समाज कल्याण अधिकारी योगेश मगदूम, दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सहाय्यक सल्लागार मंजिरी माने, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, समाज कल्याण, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त पुरस्कार्थी , सहाय्यक सेवाभावी संस्था खटाव व इतर विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि सांगलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती- उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मराठा आरक्षणावर पक्षांची भूमिका जाहीर करा!आमदारांच्या मतदारसंघनिहाय सोयीच्या भूमिकांमुळे संभ्रम भाजपा, काँग्रेस, दोन्ही शिवसेना व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी आमदार संजय कुटे यांची मागणी

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देणारा भव्यतम हिरकणी महोत्सव दिवाळीपूर्वी 1 ते 4 नोव्हेंबरला नवी मुंबईत-स्थानिक महिला बचत गटांनी निर्मिलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन – विक्री व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

vishwatmaklokswamivarta

शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी ६ मार्चपर्यंत मुदतवाढ…

नागरी सेवा परीक्षा २०२७ पूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा जाहीर सविस्तर माहितीसाठी www.siac.org.in संकेतस्थळ उपलब्ध

लाहेरीच्या तुलशी पिडसे यांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार**‘पीएम-जनमन’ अंतर्गत मिळाला सुरक्षित निवारा; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश*

vishwatmaklokswamivarta