vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नागरी सेवा परीक्षा २०२७ पूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा जाहीर सविस्तर माहितीसाठी www.siac.org.in संकेतस्थळ उपलब्ध

नागरी सेवा परीक्षा २०२७ पूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा जाहीर सविस्तर माहितीसाठी www.siac.org.in संकेतस्थळ उपलब्ध

 

अमरावती, प्रतिनिधी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२७ च्या पूर्व प्रशिक्षणाकरिता अमरावती येथील ‘भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र’ (युपीएससी) यांच्यातर्फे विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. राज्यस्तरावरून ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या या प्रवेश परीक्षेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक असून, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्राच्या संचालिका डॉ. प्रतिभा भोरजार यांनी केले आहे.

  प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार, ऑनलाइन अर्ज भरण्याचा कालावधी १ ते १७ जून २०२६ पर्यंत असणार आहे. तसेच परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम मुदत १९ जून २०२६ हा निश्चित करण्यात आला आहे. ही ऑफलाइन प्रवेश परीक्षा १९ जुलै २०२६ (रविवार) रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेतली जाईल. या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना ह्या www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

संबंधित पोस्ट

खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खतेआणि कर्ज उपलब्ध करा- पालकमंत्री शिरसाट

विकसित गडचिरोलीची पूर्तता वेगवान पद्धतीने करूया – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल प्रजासत्ताक दिन उत्साहात, देशातील प्रगतीशील जिल्हा म्हणून गडचिरोलीची नवी ओळख

vishwatmaklokswamivarta

गंगापूर धरण परिसरात २३ जानेवारी रोजी भारतीय वायू दलातर्फे एअर शोचे आयोजन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पत्रकार परिषदेत माहिती

vishwatmaklokswamivarta

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मंत्री जयकुमार रावल जिल्ह्यातील चारही तालुके दुष्काळी परिस्थितीच्या ‘प्रथम कळ’मध्ये

vishwatmaklokswamivarta

चांडोळ येथे कृषी मालासाठी उपबाजार घोषित; बुलढाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ५० गावांचा समावेश..

चिखली तालुक्यात अनधिकृत पाणी उपशावर बंदी जलस्रोतांच्या सुरक्षेसाठी भरारी पथके कार्यरत; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई