क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 136 व्या पुण्यतिथीनिमित्त जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन. यावेळी महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत, प्रा. विजय कुमठेकर, गणेश हरकळ, सुरेश रत्नपारखे, बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे, नितीन तायडे, गंगुबाई वानखेडे, मंगला खांडेभराड, मंजु घायाळ, फुलझाडेताई जालना शहर महानगरपालिकेत पुण्यतिथनिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन
जालना/प्रतिनिधी
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 136 व्या पुण्यतिथीनिमित्त जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी (दि. 28 नोव्हेंबर) अभिवादन करण्यात आले.यावेळी महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.महानगरपालिका परिसरात झालेल्या या कार्यक्रमात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस व पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, माळी महासंघाचे अध्यक्ष गणेश हरकळ, कैलास रसाळ, सचिन वानखेडे, सुरेश रत्नपारखे, गोकुळ स्वामी, मंगला खांडेभराड, गंगुबाई वानखेडे, मंजू घायाळ, संगीता फुलझाडे, प्रा. डॉ. विजय शंकरराव कुमठेकर, शिवराम अक्षय, ॲड. शिवराम सतकर, बावस्कर आदींच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलताना महापौर वंदना मगरे म्हणाल्या की, क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांनी महिला शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करून आजच्या पिढीनेही त्यांचे विचार आणि आदर्श आत्मसात करण्याची गरज आहे.उपमहापौर राजेश राऊत यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला. ते म्हणाले, महात्मा फुले यांनी गोरगरीब, दिनदलित आणि समाजातील वंचित घटकांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षणाचा पाया रचून समतेचा विचार समाजात रुजविला. त्यांच्या विचारांशिवाय सर्वांगीण विकासाची संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या विचारांवर वाटचाल करणे ही काळाची गरज आहे. माळीपुऱ्यात क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्यात येईल, तसेच माळीपुऱ्याला त्यांचे नाव देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.दरम्यान, माँ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे यांनी यापूर्वी महानगरपालिकेकडे निवेदन देऊन माळीपुऱ्यात क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्याची मागणी केली होती. यासंदर्भात महानगरपालिकेने ठरावही घेतला असल्याची आठवण त्यांनी आयुक्त अंजली शर्मा यांना करून दिली. त्यावर आयुक्तांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेत प्रवेशद्वार उभारण्याचे आश्वासन दिले. महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून मिळालेल्या या आश्वासनामुळे फुले अनुयायी व समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमात माँ सेवाभावी संस्थेच्या वतीने महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, शिवलाल अक्षय आणि ॲड. शिवराम सतकर यांना ‘महात्मा ज्योतिबा फुले गौरव सन्मान पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.कार्यक्रमास गणेश हरकळ, मंगेश खांडेभराड, वैजिनाथ नागरे, लक्ष्मण इधाटे, बबनराव घायाळ, संदीप जैवळ, बाबासाहेब बनसोडे, सचिन वानखेडे, नितीन तायडे, रूपेश बावरकर, सुरेश खांडेभराड, महेश खरात, संदीप बिंबे, अशोक खांडेभराड, मंजुषा घायाळ, संगीता फुलझाडे, राजू विठ्ठल इंगळे, दिंगबर सपकाळ, उपअभियंता कोमल गावंडे, आनंद अंभोरे, गणेश बत्तीन, रमाकांत वाघमारे, बाळासाहेब ठाकरे, बाबासाहेब गाडेकर, दशरथ तोंडुळे, योगेश गरड, मीना गडकरी, दिलीप पाऊलबुद्धे, शंकर खरात यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजय कुमठेकर यांनी केले, तर माँ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे यांनी आभार मानले.