vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

खेळातून व्यसनमुक्तीचा संदेश; खरपुडी येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न’.

खेळातून व्यसनमुक्तीचा संदेश; खरपुडी येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न’.

जालना, प्रतिनिधी : मेरा युवा भारत, जालना आणि आमची शाळा, खरपुडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन आमची शाळा, खरपुडी येथे करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत क्रीडाकौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले

या स्पर्धेमध्ये १०० मीटर धावणे, गोळाफेक आणि रस्सीखेच या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. १०० मीटर धावणे (मुली) या प्रकारात ईश्वरी लोखंडे हिने प्रथम, मयुरी ढवळे हिने द्वितीय, तर शिवानी मोरे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. गोळाफेक (मुली) प्रकारात अक्षरा भानुसे प्रथम, गौरी देशमुख द्वितीय, तर संध्या बारबैले हिने तृतीय क्रमांक मिळविला. रस्सीखेच (मुली) स्पर्धेत राणी लक्ष्मीबाई युवती मंडळाने प्रथम, माँ जिजाऊ युवती मंडळाने द्वितीय, तर राष्ट्रमाता युवती मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला.मुलांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत युवराज मुळे याने प्रथम, सुमित चव्हाण याने द्वितीय, तर आदित्य रायकर याने तृतीय क्रमांक पटकाविला. गोळाफेक प्रकारात संतोष करे प्रथम, समर्थ देशमुख द्वितीय, तर आर्यन राठोड याने तृतीय क्रमांक मिळविला. रस्सीखेच (मुले) स्पर्धेत छत्रपती युवक मंडळाने प्रथम, महाकाल युवा मंडळाने द्वितीय, तर छत्रपती शाहू महाराज युवक मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला.

या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्यासोबतच शारीरिक तंदुरुस्ती, सांघिक भावना, शिस्त आणि व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक बळीराम पाटेकर, ध्यानसिंग, अमोल शिंदे, हनुमंत पाटील, अनिल नागवे आणि सिद्धार्थ रांगडे यांनी विशेष परिश्रम घेतले

000

 

संबंधित पोस्ट

परभणीत राज्यस्तरीय शालेय आर्चरी स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ**राज्यातील आठ विभागांतील २५० खेळाडूंचा सहभाग**जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन**उत्कृष्ट प्रशिक्षक व खेळाडूंना ‘सारथी पुरस्कार’ प्रदान*

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्यायच्या राज्यस्तरीय स्पर्धेतअमरावती विभागाला सर्वसाधारण विजेतेपद

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी होणार ठाण्यात*

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा येथे आयोजित होणार राज्यस्तर शालेय हॉकी क्रीडा स्पर्धा.

vishwatmaklokswamivarta

सेवा_संकल्प_अभियानश्री क्षेत्र यवतेश्वर परिसरात स्वच्छता मोहीम संपन्न

vishwatmaklokswamivarta

खेलो इंडिया ट्रायबल गेम्स: 13 जानेवारीला अमरावतीत निवड चाचणी