vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन ३० नोव्हेंबरपर्यंत; अंतिम मतदार यादी २२ डिसेंबरला प्रसिद्ध होणार

गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन ३० नोव्हेंबरपर्यंत; अंतिम मतदार यादी २२ डिसेंबरला प्रसिद्ध होणार

जालना, प्रतिनिधी:भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत गणना प्रपत्रांच्या वितरणाची व संकलनाची प्रक्रिया १८ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ही प्रक्रिया ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार (ASDD) मतदारांसाठी गणना प्रपत्र (Enumeration Form) ECINET प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांनी ही प्रपत्रे डाउनलोड करून त्यांची छपाई करावी. प्रपत्राच्या मागील बाजूस परिशिष्ट-ब व परिशिष्ट-क तसेच आवश्यक सूचना स्वतंत्रपणे छापून मतदारांना प्रपत्रांचे वितरण करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत

मतदारांना वितरित केलेल्या गणना प्रपत्रांच्या पोहोच पावत्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी स्वतंत्र नोंदवहीत ठेवाव्यात. मोबाईलवर व्हॉट्सॲपची सुविधा असलेल्या मतदारांना पूर्ण भरलेल्या गणना प्रपत्राची प्रत व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध करून द्यावी. ही सुविधा नसलेल्या मतदारांना प्रपत्राची पोहोच स्वतंत्रपणे द्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे

****

संबंधित पोस्ट

राज्यसभा सदस्य सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने घोषित केले.

देवगडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; निधीची कमतरता भासू देणार नाही – पालकमंत्री नितेश राणे देवगड येथील पर्यटन केंद्राचे भूमिपूजन संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या-मतदार जनजागृती उपक्रमांची राज्य निवडणुक आयुक्तांकडून वाखाणणी

vishwatmaklokswamivarta

संगमनेर येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा; विविध विकासकामांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

AICCTU देशव्यापी संपाला पाठिंबा, जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन*मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेची नियोजन बैठक संपन्न***

vishwatmaklokswamivarta