vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या आवश्यक तांत्रिक कामांसाठी दिनांक 02 डिसेंबर ते 03 डिसेंबर 2026 या कालावधीत जालना शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या आवश्यक तांत्रिक कामांसाठी दिनांक 02 डिसेंबर ते 03 डिसेंबर 2026 या कालावधीत जालना शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

राज्य प्रतिनिधी-जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या आवश्यक तांत्रिक कामांसाठी दिनांक 02 डिसेंबर ते 03 डिसेंबर 2026 या कालावधीत जालना शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

शटडाऊन कालावधी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर काटकसरीने करुन पाण्याचा अपव्यय टाळावा- आयुक्‍त, जालना शहर महानगरपालिका

जालना शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्‍यात येते की, जालना शहर महानगरपालिकेमार्फत जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पैठण व अंबड येथील पंपिंग स्टेशनमध्‍ये मुख्‍य पाईपलाईन जोडण्‍यासाठी व आवश्‍यक ते तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहे. तसेच जायकवाडी-जालना मुख्‍य पाईपलाईनवर एयरवॉल्‍वची दुरुस्‍ती व बदली करणे कामी सदरील कामे सुरक्षितरित्या व तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित पंपिंग स्टेशनचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे.

उपरोक्त सर्व कामे एकाच कालावधीत पूर्ण करून पाणीपुरवठा यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने दिनांक 02 डिसेंबर ते 03 डिसेंबर 2026 या तीन दिवसांच्या कालावधीत सलग शटडाऊन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदरील कामे लवकरात लकवर पुर्ण करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्‍यात येईल

त्यामुळे सदर कालावधीत जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जालना शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. परिणामी, नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगीर आहे

तरी जालना शहरातील सर्व नागरिकांनी सदर शटडाऊन कालावधी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, पाण्याचा वापर काटकसरीने करावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या महाराष्ट्र दिन भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर

वेरूळ घृष्णेश्वर विकास आराखड्यातील कामांचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सी यांनी घेतला आढावाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधाचे काम समन्वयाने व गतीने पूर्ण करा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर उपक्रमातून सायन रुग्णालयाला अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुग्णसेवा अधिक गतिमान होणार

शहापूर व धाकलगाव येथे जलद एस.टी. बसेसना अधिकृत थांबा द्या ; एस.टी.महामंडळाकडे प्रवाशांची मागणी-विद्यार्थी,महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय ; खासगी वाहतुकीमुळे आर्थिक भुर्दंड

vishwatmaklokswamivarta

चिखली तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

महाप्रीतने कालबद्ध पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातशासकीय इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प राबवावा मस्त्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश