vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई पुस्तक महोत्सवात ‘बुलडोजर बाबा’ पुस्तकाचे अनावरण ‘लेखणी, धर्म आणि राज्य’ विषयावरील सत्रात विद्यार्थ्यांशी संवाद

मुंबई पुस्तक महोत्सवात ‘बुलडोजर बाबा’ पुस्तकाचे अनावरण-‘लेखणी, धर्म आणि राज्य’ विषयावरील सत्रात विद्यार्थ्यांशी संवाद

मुंबई, प्रतिनिधी : मुंबई पुस्तक महोत्सव २०२६ मध्ये ‘लेखणी, धर्म आणि राज्य’ या विषयावरील सत्रात पूर्व आयपीएस अधिकारी तथा माजी पोलीस महानिरीक्षक पी. के. जैन, लेखक शांतनू गुप्ता आणि लेखक संदीप सिंग यांच्याशी दैवता पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर संवाद साधला. यावेळी लेखक शांतनू गुप्ता यांच्या ‘बुलडोजर बाबा’ या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.सत्रात पी. के. जैन यांनी कायदा व सुव्यवस्था, सामाजिक समतोल, संवाद आणि प्रशासकीय व्यवस्थेतील पोलिसांची भूमिका याविषयी विवेचन केले.

समाजातील विविध घटकांमध्ये संवाद घडवून आणल्यास अनेक वाद आणि प्रश्न सोडवता येतात, असे त्यांनी सांगितले.लेखक संदीप सिंग यांनी भारतीय शहरे, मंदिरे, खानपान परंपरा आणि भारतीय सभ्यतेविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिलीविद्यार्थ्यांनी सातत्याने प्रश्न विचारत जिज्ञासू वृत्ती जोपासावी आणि भारतीय ज्ञानपरंपरेचा अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

या सत्रात तिन्ही वक्त्यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही प्रश्न विचारून चर्चेत सहभाग घेतला.

00000

संबंधित पोस्ट

समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागात २१ व २२ नोव्हेंबरला जनसुनावणी**नागरिकांना मते मांडण्याची संधी; संबंधित गट, संस्था व नागरिकांनी सहभागी व्हावे – विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल*

vishwatmaklokswamivarta

पुण्यातून मोठी बातमी पुणे एटीएसची मोठी कारवाई; पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जणांची चौकशी. 

जनगणना २०२७ प्रशिक्षण जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

vishwatmaklokswamivarta

जयंती दिनानिमित्त विशेष लेख-सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक

सत्यमेव जयते फार्मर कपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे