vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

डाक सेवांबाबतच्या तक्रारींच्या निवारणासाठी ६ नोव्हेंबर रोजी डाक अदालत

डाक सेवांबाबतच्या तक्रारींच्या निवारणासाठी ६ नोव्हेंबर रोजी डाक अदालत

 

छत्रपती संभाजीनगर, द प्रतिनिधी) : टपाल सेवा, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्रे आदी डाक सेवांबाबतच्या प्रलंबित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रवर अधीक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या वतीने शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. ही डाक अदालत प्रवर अधीक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयात होणार आहे.छत्रपती संभाजीनगर डाक विभागांतर्गत येणाऱ्या ज्या नागरिकांच्या डाक सेवेसंदर्भातील तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झालेले नाही किंवा संबंधित कार्यालयाकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींची या डाक अदालतीत दखल घेण्यात येणार आहे

यामध्ये विशेषतः टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्रे आदी सेवांशी संबंधित तक्रारींचा समावेश असेल. तक्रार अर्जामध्ये तक्रारीचा संपूर्ण तपशील, मूळ तक्रार पाठविल्याची तारीख तसेच ज्या अधिकाऱ्याकडे तक्रार पाठविली होती, त्या अधिकाऱ्याचे नाव व पदनाम नमूद करणे आवश्यक आहे

संबंधित नागरिकांनी आपली तक्रार प्रवर अधीक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर – ४३१००१ यांच्या नावे दोन प्रतींमध्ये तयार करून दि. ३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी कार्यालयात पोहोचेल अशा पद्धतीने पाठवावी. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या दोन प्रकल्पाचे लोकार्पण

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ• रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीस हिरवी झेंडी दाखवून केले मार्गस्थ 

औषध विक्रेत्यांनी नियमाचे पालन करुन औषध विक्री करावी -अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा व नियमान्वये मे. तोष्णीवाल मेडिकल्सवर कारवाई

80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संबोधनाचा मजकूर