vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमरावती विभागातील धर्मादाय संस्थांचा पुढाकार *मुख्यमंत्री सहायता निधीत 18 लाख 10 हजारांचे योगदान

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमरावती विभागातील धर्मादाय संस्थांचा पुढाकार *मुख्यमंत्री सहायता निधीत 18 लाख 10 हजारांचे योगदान

अमरावती, प्रतिनिधी): राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक संकटकाळात मदत मिळावी, या उदात्त हेतूने अमरावती विभागातील धर्मादाय संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. धर्मादाय आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अकोला जिल्ह्यातील धर्मदाय संस्थांनी मुख्यमंत्री धर्मादाय सहायता निधी खात्यात एकूण १८ लाख १० हजार रुपयांचे आर्थिक योगदान जमा केले आहे.समाजातील इतर गरजू, वंचित व संकटग्रस्त घटकांना मदत करण्यासाठी अमरावती विभागातील अन्य धर्मदाय संस्थांनी योगदान द्यावे, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त दीपक खोचे यांनी केले आहे.

      राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमरावती विभागाचे धर्मादाय सह आयुक्त दीपक खोचे यांच्या विशेष पुढाकाराने हे मदत अभियान राबविण्यात आले. या अभियानातून गोळा झालेल्या एकूण १८ लाख १० हजार रुपयांचा धनादेश १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दीपक खोचे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द केला.

       या संकटकाळात प्रामुख्याने अकोला जिल्ह्यातील चार संस्थांनी योगदान दिले आहे.यात अकोला येथील झारतोश्ती अंजुमन ट्रस्टने १६ लाख रुपये,श्री रामचंद्र व मारोती संस्थान न्यास, रिधोरा (ता.अकोट,जि.अकोला) यांनी १ लाख रुपये, सतीमाता शैक्षणिक बहुउद्देशीय क्रीडा मंडळ,अंजनी खुर्द (ता.बार्शीटाकळी,जि. अकोला)यांनी १लाख रुपये आणि भक्तिधाम मंदिर ट्रस्ट,मूर्तिजापूर (जि.अकोला) यांनी १० हजार रुपये सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धर्मादाय संस्थांनी तत्परता दाखवून सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्तम उदाहरण सादर केले आहे.

     धर्मादाय संस्थांचा हा पुढाकार अभिमानास्पद व कौतुकास्पद असून, समाजातील इतर गरजू, वंचित व संकटग्रस्त घटकांना मदत करण्यासाठी संस्थांनी भविष्यातही असेच योगदान द्यावे, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाचेवीज बिल शून्यावर आणणार- पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडेपशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सौरऊर्जा प्रकल्पासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाचा ‘महाप्रीत’सोबत सामंजस्य करार,पशुसंवर्धन विभागाच्या जागांवर प्रायोगिक सौरऊर्जा प्रकल्पआयुक्त कार्यालयातील इमारतींची छते आणि साकूड येथील प्रक्षेत्राचा पहिल्या टप्प्यात समावेश..

vishwatmaklokswamivarta

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७-नियोजित विकास कामे समन्वयाने वेळेत पूर्ण करावीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल-त्र्यंबकेश्वर येथे विविध विकास कामांची पाहणी…

लोकाभिमुख योजनामुळे एसटी महामंडळ प्रगती करीत आहे- पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील लोणी बस स्थानकात विकास कामाचा शुभारंभ

नमुंमपा निवडणूक 2025-2026 करिता मतदान अधिका-यांच्या प्रशिक्षणास नेरुळ विभागापासून प्रारंभ-प्रशिक्षणास गैरहजर कर्मचा-यांवर कायदेशीर कारवाई

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविण्याचे आवाहन

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप- जिल्ह्यात 657 उमेदवारांची नियुक्ती