vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योगासाठी अनुदानाची संधी;ऑफलाइन अर्ज मागविले

तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योगासाठी अनुदानाची संधी;ऑफलाइन अर्ज मागविले

बुलढाणा, प्रतिनिधी) : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया २०२६-२७ तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियान २०२६-२७ अंतर्गत शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था व उद्योजकांना तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत फिल्टर प्रेससह मिनी ऑईल मिल उभारण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाला युनिट किमतीच्या ४० टक्के, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, सीमांत व महिला प्रवर्गाला ५० टक्के अनुदान मिळणार असून, त्याची कमाल मर्यादा ४ लाख रुपये आहे

फिल्टर प्रेसशिवाय मिनी ऑईल मिलसाठी अनुक्रमे ४० व ५० टक्के अनुदान असून, कमाल मर्यादा ३ लाख रुपये आहे. यासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी आणि मूल्य साखळी भागीदार पात्र आहेत

तसेच १० टन क्षमतेच्या तेल काढणी युनिटसाठी मोठ्या स्तरावरील प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदीकरिता प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल ९.९० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. यासाठी वैयक्तिक शेतकरी, FPO/FPC, सहकारी संस्था, सार्वजनिक अथवा खासगी उद्योग, नोंदणीकृत नवीन तेल प्रक्रिया कंपन्या आणि मूल्य साखळी भागीदार पात्र असून, बँक कर्ज मंजुरी आवश्यक आहे.

कडधान्य आत्मनिर्भरता अभियान २०२६-२७ अंतर्गत कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट उभारण्यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल २५ लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. FPO, क्लस्टर स्तरावरील महासंघ (CLF), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) आणि २१ वर्षे पूर्ण केलेले वैयक्तिक उद्योजक यासाठी पात्र आहेत.

कडधान्य प्रक्रिया युनिटची किमान क्षमता प्रति तास ३०० किलो असणे आवश्यक आहे. तसेच FSSAI नोंदणी व पर्यावरणीय नियमांचे पालन बंधनकारक आहे. हे अनुदान ‘क्रेडिट लिंक्ड बॅक-एंडेड सबसिडी’ स्वरूपाचे असल्याने लाभार्थ्याला बँक कर्ज घेणे अनिवार्य आहे.

या योजनांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह आपले ऑफलाइन अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तातडीने सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

000000

संबंधित पोस्ट

मराठा आरक्षणावर पक्षांची भूमिका जाहीर करा!आमदारांच्या मतदारसंघनिहाय सोयीच्या भूमिकांमुळे संभ्रम भाजपा, काँग्रेस, दोन्ही शिवसेना व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी आमदार संजय कुटे यांची मागणी

vishwatmaklokswamivarta

टाकाऊ वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्रातून कापडी कच-याच्या समस्येचे निराकरण तसेच महिलांचे सक्षमीकरण…

राज्यभरातील शिशु पोषणासाठीच्या अन्नाचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री, नाममुद्रांकन आणि प्रचार यांचे विनियमन करणारा सर्वसमावेशक अनुपालन आदेश जारी करण्यात आला असल्याचे, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

vishwatmaklokswamivarta

शहर विकास आराखड्यातील आरक्षित जागेवर भव्य उद्यान, मैदान व नाट्यगृहउभारावे; आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाचानिधी उपलब्ध करू – नगरसेवक अश्विन अंबेकर

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले महिलांच्या स्वप्नांना बळ,- सावळीत महिला गृहउद्योग केंद्र, स्वयंरोजगार विक्री केंद्राचे लोकार्पण- पौष्टिक लाडुंची खरेदी करून महिलांना स्वतः केले वाटप – जिल्ह्यात 90 स्वयंरोजगार विक्री केंद्रे, डीपीसीतून अडीच कोटींचा निधी 32 महिला गृहउद्योग केंद्रांसाठी डीपीसीतून अडीच कोटींचा निधी…

चिखलदऱ्याची कॉफी राष्ट्रीय पातळीवर नेणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास चिखलदरा ते दिल्लीपर्यंत मार्केट उपलब्ध करू