
नशामुक्त युवा, विकसित भारत संकल्पनेवर जिल्हास्तरीय युवा महोत्सव26 नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात आयोजन; 15 ते 29 वयोगटातील युवक-युवतींना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी..
बुलढाणा, प्रतिनिधी : युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करण्यासह राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा आणि मेरा युवा भारत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 26 नोव्हेंबर 2026 रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे हा महोत्सव होणार आहे.
यावर्षी महोत्सवाची ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ ही संकल्पना असून, त्याअंतर्गत विविध कला व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित केला जातो. जानेवारी 2027 मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, पथनाट्य, चित्रकला आणि कविता लेखन अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या माध्यमातून युवक-युवतींना आपली कला, प्रतिभा आणि सर्जनशीलता सादर करण्याची संधी मिळणार असून, विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.या महोत्सवात 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी संस्थेच्या लेटरहेडवर प्रवेश नोंदणी करून dsobld\@gmail.com या ई-मेलवर पाठवावी. तसेच स्पर्धेच्या प्रवेशिका क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांच्याकडे जमा कराव्यात. अधिक माहितीसाठी 9764732764 या क्रमांकावर संपर्क साधावा.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे आणि मेरा युवा भारतच्या समन्वयक दीक्षा पोमण यांनी केले आहे.
00000



