vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

सांगली शहरात रॅपिडो अ‍ॅपच्या माध्यमातून विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई- अनधिकृत दुचाकी प्रवासी वाहतूक करू नये; उपप्रादेशिक परिवहन विभागाचे आवाहन

सांगली शहरात रॅपिडो अ‍ॅपच्या माध्यमातून विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई- अनधिकृत दुचाकी प्रवासी वाहतूक करू नये; उपप्रादेशिक परिवहन विभागाचे आवाहन

सांगली, प्रतिनिधी : सांगली शहरात रॅपिडो अ‍ॅपच्या माध्यमातून दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसार गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली 18 नोव्हेंबर 2026 रोजी ही कारवाई करण्यात आली.

रॅपिडो अ‍ॅपच्या माध्यमातून दुचाकी वाहनांचा वापर करून आवश्यक परवाना व अधिकृत मान्यता नसताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कारवाई करण्यात आली. ही कारवाई मोटार वाहन निरीक्षक आकाश कांबळे व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सिद्धार्थ कोल्हाटे यांनी केली.

महाराष्ट्र राज्यात अधिकृत मान्यता नसताना अशा प्रकारच्या अ‍ॅपचा वापर करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवास करू नये, असे आवाहन परिवहन विभागामार्फत नागरिकांना करण्यात आले आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिकृत परवाना व मान्यता असलेल्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवांचाच वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई -दरोडे टाकणाऱ्या बदाम गॅंग च्या सात आरोपींना अटक

माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना गडचिरोली पोलीस व नारायणपूर (छ.ग.) पोलीसांकडून नष्ट

पुरुषांच्या शरीराबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी-सेजल पवार विरोधात एफआयआर दाखल

परराज्यातील अवैध मद्य वाहतूक प्रकरणी कारवाई; २ कोटी ३० हजाराचा मुद्देमाल जप्त

पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले; मुंबईतील मुलुंड रेल्वे स्टेशनवर गंभीर प्रकार

आलापल्ली वनपरिक्षेत्रात वनविभागाच्या धडक कारवाईत १२ शिकारी ताब्यात वन्यजीव अवयवांसह साहित्य जप्त; कायदेशीर कारवाई सुरू