vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सैन्यदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी नाशिक येथे निःशुल्क एसएसबी (SSB) पूर्वप्रशिक्षण कोर्सचे आयोजन

सैन्यदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी नाशिक येथे निःशुल्क एसएसबी (SSB) पूर्वप्रशिक्षण कोर्सचे आयोजन

ठाणे, प्रतिनिधी :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना ‘सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड’ (SSB) या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाशिक रोड, नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात एसएसबी कोर्स क्रमांक 68चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक १४ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०२६ या कालावधीत हा विशेष प्रशिक्षण वर्ग चालवला जाणार असून, या कालावधीत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना शासनामार्फत निःशुल्क प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांची निवड मुलाखत दिनांक १० डिसेंबर २०२६ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे येथे घेण्यात येणार आहे. मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील ‘डीएसडब्ल्यू पोर्टल’मधील (Resources – PCTC Nashik – SSB 68) विभागातून किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्रवेशपत्र व त्यासोबतच्या परिशिष्टांची प्रत प्राप्त करून ती पूर्ण भरून मुलाखतीस सोबत आणावी. या प्रशिक्षण वर्गासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी दिनांक १३ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक आहे

या प्रशिक्षणास प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवाराने केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा (CDSE) किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी परीक्षा (NDA) उत्तीर्ण होऊन एसएसबी मुलाखतीसाठी पात्र ठरलेले असणे आवश्यक आहे. याशिवाय एनसीसी स्पेशल एन्ट्री, टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) किंवा युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीम (UES) यापैकी कोणत्याही एका शाखेचे एसएसबी मुलाखतीचे कॉल लेटर असलेले अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असलेले उमेदवारही या वर्गासाठी पात्र राहतील. उमेदवारांनी कोर्सला येताना यापैकी संबंधित पात्रता प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे

अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या training.pctcnashik@gmail.com या ई-मेल आयडीवर अथवा ०२५३-२४५१०३२ या दूरध्वनी क्रमांकावर व ९१५६०७३३०६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ठाणे व पालघर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

000000000

संबंधित पोस्ट

महिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती – राज्यपाल जिष्णु देव वर्मा १०० सर्वाधिक प्रभावशाली महिलांचा सन्मान; नीता अंबानी, स्मृती इराणी, झिया मोदी, नीरजा बिर्ला यांची उपस्थिती

माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळावा 

सह्याद्रीच्या कुशीत रंगलेला ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’

मेळघाटात 10 मोबाईल टॉवरला मंजुरी*जिल्हा सनियंत्रण समितीची मान्यता

विद्यापीठांनी ‘स्कूल – कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम कसोशीने राबवावेत – राज्यपाल जिष्णु देव वर्मा अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल लोकभवन येथे पाठवण्याची सूचना

प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे