vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महात्मा फुले वाड्या’तील वटपूजनावर लादलेली बंदी मागे; हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे यश!**बंदी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ?* – रमेश शिंदे

*‘महात्मा फुले वाड्या’तील वटपूजनावर लादलेली बंदी मागे; हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे यश!**बंदी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ?* – रमेश शिंदे

राज्य प्रतिनिधी

 पुण्यातील ऐतिहासिक ‘महात्मा फुले वाडा’ परिसरातील वटवृक्षाच्या पूजनावर पुरातत्व विभागाने घातलेली बंदी अखेर शासनाने मागे घेतली आहे. हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, सुराज्य अभियान आणि रणरागिणी शाखा यांच्या शिष्टमंडळाने पुरातत्त्व विभाग, पोलीस प्रशासन आणि पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयात निवेदने देऊन ही संभाव्य बंदी त्वरित उठवण्याची मागणी केली होती. याला संघटित प्रयत्नांमुळे मोठे यश आले असून प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे.

 

 हा हिंदु महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्यावरील आणि संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवरील आघात असल्याचे निवेदनात म्हटले होते. हिंदुत्वनिष्ठांच्या या तीव्र आंदोलनाची आणि मागण्यांची नोंद घेत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे साहाय्यक संचालक डॉ. विलास वाहने यांनी खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवले आहे. यात म्हटले आहे की, ‘महात्मा फुले वाडा हे स्मारक राज्य संरक्षित घोषित होण्यागोदरच्या काळापासून चालत आलेल्या परंपरा व चालीरीती यांची सद्यःस्थिती कायम ठेवावी. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी आवश्यक ती कार्यवाही व्हावी.’*बंदी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ? – श्री रमेश शिंदे* या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी म्हटले की, फुले वाड्यासमोरील वटवृक्षाच्या येथे वटसावित्री व्रताचे चालू असलेले पारंपारिक पूजन बंद करण्याचा तुघलकी आदेश पुरातत्व खात्याने काढला होता. त्याला हिंदु जनजागृती समितीकडून विरोध केल्याने आणि अधिवक्त्यांनी कायदेशीर नोटीस दिल्याने त्यांना लोकशाहीची जाणीव झाली आणि भारतात धर्मस्वातंत्र्य आहे, हे मान्य करून त्यांनी तो तुघलकी आदेश मागे घेतला आहे. फडणवीस सरकारचे याबद्दल अभिनंदन; मात्र या प्रकरणात सरकारने हिंदूंना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या, तसेच झारीतील शुक्राचार्य बनलेल्या पुरातत्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना सध्या महाराष्ट्रात असा तुघलकी कारभार चालणार नसल्याचे लक्षात आणून द्यावे, ही सरकारकडे मागणी आहे.

 या यशानंतर समितीच्या वतीने समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी आवाहन केले आहे की, “जास्तीत जास्त हिंदू महिलांनी महात्मा फुले वाडा येथे जमून उत्साहात वटवृक्षाचे पूजन करावे आणि आपली धार्मिक परंपरा जपून या विजयाचा आनंद साजरा करावा”.*श्री. सुनील घनवट,*राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती (संपर्क: ७०२०३८३२६४)

संबंधित पोस्ट

बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करा

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.एकनाथ शिंदे व श्रीमती लता एकनाथ शिंदे यांचे Enumeration Form आज भरून घेण्यात आले.

आरोग्य शिक्षणासाठी प्रभावी माहिती, शिक्षण व संवाद यंत्रणा अधिक सक्षम करा– आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस•कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणीकांदा प्रश्न बाबत विधानभवनात बैठक

vishwatmaklokswamivarta

मुद्देमाल हस्तांतरणातून नागरिकांचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास दृढ- विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा- चार कोटींचा मुद्देमाल हस्तांतरीत- 134 तोळे सोन्याचे दागिने, 40 किलो चांदी परत- 283 मोबाईल, 24500 किलो बेदाण्याचा समावेश

शेतकऱ्यांना चारा बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन