vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

२०३५ पर्यंत राज्यातील सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार- मंत्री प्रताप सरनाईक

२०३५ पर्यंत राज्यातील सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार- मंत्री प्रताप सरनाईक

            मुंबई, प्रतिनिधी : पर्यावरणपूरक, आधुनिक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचा संपूर्ण बस ताफा २०३५ पर्यंत टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली

            याबाबत सदस्य श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य परिणय फुके, सतेज पाटील, प्रविण दरेकर, भावना गवळी, निरंजन डावखरे, उमा खापरे, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, चंद्रकांत रघुवंशी यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

        मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळाने ५,१५० इलेक्ट्रिक बस घेण्याचा करार केला असून, त्यापैकी ९०० हून अधिक बस महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. या बसेस यशस्वीपणे प्रवासी सेवा देत आहेत. या करारानुसार राज्यात १७२ चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ३९ चार्जिंग स्टेशन पूर्ण झाली असून, आणखी ४५ स्टेशन पुढील तीन महिन्यांत कार्यान्वित होतील. उर्वरित स्टेशनही लवकर पूर्ण करण्यासाठी एसटी महामंडळ संबंधित कंपनीशी समन्वय साधत आहे. एसटी स्थानकांच्या २०० मीटर परिसरात अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असल्याचे सांगत आतापर्यंत २०० हून अधिक खासगी बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

        पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी २०३५ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे. सध्या कार्यरत बससह नव्याने खरेदी होणाऱ्या बसचा समावेश या योजनेत करण्यात येणार असून, जुन्या बसचेही टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर केले जाणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र हे संपूर्ण इलेक्ट्रिक एसटी ताफा असलेले देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.       ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात एसटी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पुढील तीन वर्षांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. बस डेपो आणि बसपोर्टचे आधुनिकीकरण, चालक-वाहकांसाठी निवास व्यवस्था तसेच आवश्यक सुविधांसाठी सुमारे २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.      महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुविधेलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

पायभूत सुविधा निर्मितीतून लातूर पोलीस दल आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• लातूर सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण• नवनियुक्त ४६ पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप• क्यूआर कोड आधारित पेट्रोलिंग यंत्रणेचा शुभारंभ

शासकीय आदर्श आश्रमशाळांमध्ये इयत्ता पाचवी प्रवेशासाठी १२ एप्रिल रोजी पूर्व परीक्षेचे आयोजन

अभिमानाचा क्षण! 🇮🇳बुलढाणा जिल्ह्याचा सुपुत्र, सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील हवालदार संतोष मोरे यांना ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘शौर्य पदक’ प्रदान

परभणीतील शेतकऱ्यांना पाणी उपलब्धता वाढविण्यास प्राधान्य द्यावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर जलसंधारण व सिंचन क्षमतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन· राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध मान्यवरआणि चाहत्यांनी घेतले अखेरचे दर्शन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा’ आयोजित