vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त..

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त…

 विदेश प्रतिनिधी

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकाच्या कुटुंबीयांप्रती भारताने सखोल शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, जखमी झालेल्यांच्या लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. तसेच, खलाशांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्यांचा आणि हिंसाचाराचा भारताने तीव्र निषेध केला आहे.परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हिंसाचार तात्काळ थांबवून शांतता, सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्याच्या हितासाठी संवाद आणि राजनैतिक मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.

 दरम्यान

आम्ही इराणच्या उप-राजदूतावास प्रमुखांना बोलावून एक निवेदन जारी केले असून या घटनेचा कठोर शब्दांत निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक भारतीय जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

या प्रकरणी भारताने इराणकडे तीव्र निषेध नोंदवत अशा हल्ल्यांना तात्काळ पूर्णविराम देण्याची मागणी केली आहे. तसेच, तणाव कमी करून संबंधित दोन्ही पक्षांनी संवाद आणि राजनैतिक मार्ग स्वीकारावा, जेणेकरून पश्चिम आशियात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित होईल, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

जागतिक ग्राहक दिनानिमित्त विशेष लेख :जागतिक ग्राहक हक्क दिन : “Safe Products, Confident Consumers”

निझर्णेश्वर मंदिर देवस्थान संगमनेर तालुक्यातील प्रमुख पर्यटन केंद्र होणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई मोठे उद्योग-रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, ब्लिंकिट आणि झोमॅटो हायपरप्युअर या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

vishwatmaklokswamivarta

वर्ल्ड लीडरशिप फोरमतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी….

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टी व दरडींच्या धोक्यामुळे आंबेनळी घाट ३१ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल होण्याचा व प्रवास टाळण्याचा जिल्हा आरोग्य यंत्रणेचा सल्ला

vishwatmaklokswamivarta