vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

एड्स नियंत्रण आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा – जिल्हाधिकारी संतोष पाटील

एड्स नियंत्रण आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा – जिल्हाधिकारी संतोष पाटील

 

 सातारा द प्रतिनिधी  – जिल्ह्यात एड्स नियंत्रण आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा एड्स नियंत्रण समिती आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीची बैठक झाली त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल जाधव यांच्या सह समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्ह्यातील एड्स रुग्णांच्या उपचारांचा योग्य पाठपुरावा करावा, अशा सूचना करून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, सर्व आरोग्य केंद्रांमध्ये एड्स तपासणी करण्यात यावी. तसेच शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये तंबाखू मुक्त करण्याची कार्यवाही लवकर पूर्ण करावी. यापूर्वी तंबाखुमुक्त झालेल्या शाळांची नियमित तपासणी करावी. तंबाखू विरोधी मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी त्याचे व्यसन जडलेल्या मुलांचे समुपदेशन कार्यक्रम राबवण्यात यावा. तसेच शाळांमध्ये मुलांच्या मौखिक आरोग्य तपासणीची शिबिरे घेण्यात यावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 

०००००

संबंधित पोस्ट

राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय…

जिल्हा आरोग्य संपन्न करण्यासाठी आरोग्य निर्देशांकांवर भर द्याजिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

2.70 लाखाहून अधिक नागरिकांची आयुष्मान कार्ड निर्मिती – आयुष्मान कार्ड काढून घेण्याचे आवाहन

सांगली जिल्ह्यात २००८ रुग्णांना सुमारे १४.४० कोटींची मदत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मातृ आरोग्याला प्राधान्य..जुलै २०२६ अखेर ९१ टक्के पात्र मातांना आयर्न सुक्रोज/फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शनचे उपचार

श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४८ हजार २९६ नागरिकांची आरोग्य तपासणी**६५० आरोग्य शिबिरांचे आयोजन; ५०६ रुग्ण पुढील उपचारासाठी संदर्भित**१० हजार ८९४ रक्ततपासण्या; ६९० जणांचे रक्तदान, २ हजार ३२ नागरिकांची आभा कार्डसाठी नोंदणी*

vishwatmaklokswamivarta