vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जलयुक्त शिवार अभियान २.० च्या कामांना गती द्या; जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

जलयुक्त शिवार अभियान २.० च्या कामांना गती द्या; जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी: जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत सुरू असलेली मृद व जलसंधारणाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास न्यावीत. प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून नाला खोलीकरणासह विविध जलसंधारण कामांना गती द्यावी. तालुकास्तरीय यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलयुक्त शिवार अभियान २.० च्या आढावा बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम., उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके, जिल्हा जलसंधारण अधिकारी (जि.प.) कपिल बिडकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल यांच्यासह महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत विभाग, वन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, कृषी, महसूल, भूमी अभिलेख तसेच मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) सहभागी झाले.

बैठकीत जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण–गाळयुक्त शिवार अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) २.०, ‘कॅच द रेन’ (Catch the Rain Portal) अभियान तसेच अ सेट मॅपिंग (Asset Mapping) अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विभागांकडून राबविण्यात येत असलेल्या जलसंधारण उपचार व उपाययोजनांच्या प्रगतीचे परीक्षण करून आवश्यक सूचना देण्यात आल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देत नाला खोलीकरणाच्या कामांवर विशेष भर देण्यास सांगितले. येत्या पावसाळ्यात अधिकाधिक जलसंचय होण्यासाठी सर्व कामे दर्जेदार व नियोजित वेळेत पूर्ण करावीत. विविध विभागांनी परस्पर समन्वय राखून जलसंधारणाच्या कामांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच ‘कॅच द रेन’ पोर्टलवरील माहिती वेळेत अद्ययावत करणे, असेट मॅपिंगची कामे पूर्ण करणे आणि जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले.

00000

संबंधित पोस्ट

दुबई येथून १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले; उर्वरित नागरिकांना आणण्याची कार्यवाही सुरु

आषाढी पालखी सोहळा-२०२६ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

जालना शहरातील वीजसमस्या सोडवा, २५ नवीन रोहित्रे मंजूर करा – भास्कर आबा दानवे- विद्युत खांब, लोंबकळणाऱ्या तारांसह पथदिव्यांच्या समस्यांबाबत ऊर्जाराज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना निवेदन

vishwatmaklokswamivarta

अक्षयतृतीयेला सांगली जिल्ह्यात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या  – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील- बालविवाह ठरला किंवा होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा पोलीस   विभागाच्या 112 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- नियम मोडल्यास होणार कडक कारवाई वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालयचालक, जाणीव पूर्वक व जबरदस्तीने बाल विवाह   केल्यास होणार गुन्हे दाखल 

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट उपक्रमाकडून १३६ जादा बसगाड्या सोडण्यात येणार