vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

शिवनी येथे ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत घरोघरी आरोग्य तपासणी;३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी; समुपदेशनासह मोफत औषधोपचार

शिवनी येथे ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत घरोघरी आरोग्य तपासणी;३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी; समुपदेशनासह मोफत औषधोपचार

 

बुलढाणा, प्रतिनिधी: सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्य सेवा त्यांच्या घरापर्यंत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दि. 30 सप्टेंबर रोजी गाव शिवनी येथे घरोघरी आरोग्य तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. आरोग्य पथकाने गावातील 30 वर्षांवरील नागरिकांची तपासणी करून आवश्यकतेनुसार समुपदेशन, मोफत औषधोपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून दिली.

या मोहिमेदरम्यान नागरिकांची उच्च रक्तदाब (BP), मधुमेह (Blood Sugar) तसेच मुख कर्करोगाची पूर्वतपासणी करण्यात आली. यासोबतच इतर जुनाट तसेच हंगामी आजारांची लक्षणे तपासून नागरिकांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

तपासणीमध्ये आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या नागरिकांना पुढील तपासणी व उपचारासाठी आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा देण्यात आली. तसेच गरजेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी, आजारांची लक्षणे दिसून आल्यास तातडीने आरोग्य संस्थेशी संपर्क साधणे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले.

या आरोग्य मोहिमेत डॉ. विशाल दाने, डॉ. विश्वजित त्रिकार व डॉ. विजय दुतवंडे, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका व आरोग्य पथकाने सहभाग घेतला.

आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, तपासणी आणि उपचाराची सुविधा त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिकांनी या आरोग्य सेवांचा लाभ घेऊन वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले.

0000

संबंधित पोस्ट

आरोग्य – सामाजिक क्षेत्रातील संस्थांच्या सहकार्याने आरोग्य सेवा तळागाळात पोहोचणार – डॉ. स्वानंद सोनारजिल्ह्यातील ६८ स्वयंसेवी संस्था, रुग्णालय प्रतिनिधींची बैठकनिरामय अहिल्यानगर अभियान’वर सविस्तर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ठाणे जिल्ह्यात आरोग्यसेवांचा व्यापक विस्तार; १०७ उपक्रमांतून १४,७८२ नागरिकांना लाभआरोग्य तपासणी, NCD स्क्रीनिंग, मानसिक आरोग्य, पोषण, महिला आरोग्य, व्यसनमुक्ती व निरोगी जीवनशैली जनजागृतीला विशेष प्राधान्य

vishwatmaklokswamivarta

प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव वळण येथे “सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा”चे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न.. गावपातळीवरच दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर; ४४ प्रशिक्षणार्थींचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

पारुंडी येथे ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिर ३० वर्षांवरील नागरिकांची असंसर्गजन्य आजारांसाठी तपासणी

vishwatmaklokswamivarta

रूग्णालयातील स्टोअरमधून औषध खरेदीची सक्ती नको‘एफडीए’चा इशारा

कुपोषित बालकांमधील टीबी तपासणीला मिळणार गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक तपासणी प्रतिबंधात्मक उपचार व डिजिटल नोंदणीवर भर

vishwatmaklokswamivarta