vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली दुष्काळी स्थितीची पाहणी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली दुष्काळी स्थितीची पाहणी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी– दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शेकटा मंडळात पिकांच्या अवस्थेची पाहणी केली. त्यांचे समवेत आमदार अनुराधा चव्हाण, आमदार नारायण कुचे, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकटेश राठोड, तहसीलदार शिवानंद बिडवे तसेच शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.शेकटा मंडळातील गाढे जळगाव येथील गट नंबर ३७६ येथील मजूर उस्मान खान पठाण या शेतकऱ्याच्या शेतात श्री. बावनकुळे यांनी पाहणी केली. शेतातील सोयाबीन या पिकाची दुरावस्था झाली असून पाण्याअभावी पूर्ण पीक करपून गेले आहे.

श्री. बावनकुळे म्हणाले की, शासनाने तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून संपूर्ण यंत्रणा आता पंचनामे करीत आहे. अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांना अधिक मोबदला कसा देता येईल, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना मोबदला मिळावा यासाठीही शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे श्री. बावनकुळे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले.

 

०००००

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या, स्वच्छतागृह आदींच्या सद्यस्थितीचा अहवाल सात दिवसात द्या – पालकमंत्री पंकजा मुंडे- शाळा दुरुस्तीचा निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश- आदर्श शाळा, आधुनिक ग्रंथालये आणि रेशीम ब्रँडिंगसाठी कालबद्ध आराखडा तयार करा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मनोरा आमदार निवाससाठी ५५.५० कोटींच्या विकास शुल्कासह वाढीव खर्चाला मंजुरी फेब्रुवारी २०२८ पर्यंत भव्य आणि सुसज्ज ४२ मजली इमारत; मिनी थिएटर, जिम आणि आधुनिक सुविधांचा समावेश

राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने नेपाळमधील निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांचे केले अभिनंदन

जिल्ह्यातील नागाव, काशीद आणि हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यांवर अत्याधुनिक रोबोटिक वॉटर क्राफ्ट तैनात

vishwatmaklokswamivarta

अरबी समुद्रातील उच्च भरतीच्या लाटांचा ऑरेंज अलर्टमुळे मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन- किनारपट्टीवरील नागरिक – पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta