vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मसकऱ्या गणेशोत्सव नागपूरची वैभवशाली सांस्कृतिक ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी घेतले मसकऱ्या गणपतीचे दर्शन

मसकऱ्या गणेशोत्सव नागपूरची वैभवशाली सांस्कृतिक ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-मुख्यमंत्र्यांनी घेतले मसकऱ्या गणपतीचे दर्शन

नागपूर, प्रतिनिधी– नागपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत मसकऱ्या गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. नागपूरची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत, त्यापैकी एक हा गणेशोत्सव आहे. ही ऐतिहासिक व वैशिष्ट्यपूर्ण परंपरा शेकडो वर्षांपासून भोसले घराण्याने अतिशय आदराने जपली आहे. हा गणेशोत्सव केवळ एक धार्मिक उत्सव नसून नागपूर शहराची एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि वैभवशाली सांस्कृतिक ओळख बनला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

महाल येथील सीनिअर भोसला पॅलेस येथे श्री महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या ऐतिहासिक ‘मसकऱ्या गणपती’च्या दर्शनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (पंचम), राजे मुधोजी भोसले आणि राजे जयसिंह भोसले आदी उपस्थित होते.सीनिअर भोसला पॅलेस येथे आगमन होताच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गणरायाचे दर्शन घेतले. याप्रसंगी नागपूरच्या भोसले घराण्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

आपल्या भाषणात मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, नागपूरकर भोसले घराण्याचा इतिहास अत्यंत जाज्वल्य आणि देदीप्यमान राहिला असून, पूर्वेकडे हिंदवी स्वराज्याचा विस्तार करण्यात या घराण्याचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. आजच्या काळातही सर्व ऐतिहासिक प्रथा आणि परंपरा मुधोजी राजे भोसले यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अतिशय उत्साहात पार पडत आहेत हे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.नागपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत मसकऱ्या गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. मसकऱ्या गणपतीला ‘हडपक्या गणपती’ असेही म्हटले जाते. भाद्रपदातील सार्वजनिक गणेशोत्सव संपल्यानंतर पितृपक्षात हा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे हा उत्सव नागपूरच्या अन्य गणेशोत्सवांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.

संबंधित पोस्ट

देशाची अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची – राज्यपाल जिष्णू देव वर्मा,महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३९ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित-शाश्वत शेतीसाठी सर्व घटकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मकर संक्रांतीचे महत्त्व-   अध्यात्मिक वार्ता- 

vishwatmaklokswamivarta

राज्यातील महामार्गांवरील गंभीर अपघातांतील जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचविण्यास मदत व्हावी, यासाठी हवाईरुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जलशुद्धीकरण सयंत्राच्या देखभाल दुरुस्तीचे धोरण आणणार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोयाबीन पीक कापणी प्रयोग