vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सेवा संकल्प अभियानांतर्गत निंभोरा बुद्रुक येथे कुष्ठरोग शोध मोहीम लवकर निदान व उपचारासाठी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी

सेवा संकल्प अभियानांतर्गत निंभोरा बुद्रुक येथे कुष्ठरोग शोध मोहीम लवकर निदान व उपचारासाठी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी

बुलढाणा, प्रतिनिधी : सेवा संकल्प अभियानांतर्गत कुष्ठरोगाचे लवकर निदान करून तातडीने उपचार सुरू करणे तसेच रोगाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे कुष्ठरोग शोध व सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान आरोग्य पथकाने घरोघरी भेट देऊन नागरिकांची तपासणी केली. कुष्ठरोगाची लक्षणे, लवकर निदानाचे महत्त्व तसेच वेळेत उपचार घेतल्यास रोगावर नियंत्रण मिळविता येते, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास कदम यांच्या आदेशानुसार, डॉ. शकील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आरोग्य निरीक्षक जितेंद्र सदाशिव यांच्या निरीक्षणाखाली आरोग्य सेवक सोपान माटे, आरोग्य सेवक प्रवीण टवलारकर आणि आशा सेविका पुष्पा वाघ यांनी सर्वेक्षणात सक्रिय सहभाग घेतला.

“कुष्ठरोग लपवू नका, वेळेत तपासणी करून उपचार घ्या,” असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले. कुष्ठरोगाचे लवकर निदान, योग्य उपचार आणि नियमित उपचार यामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते. नागरिकांनी कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले.

0000

संबंधित पोस्ट

टीबीमुक्त रायगडसाठी ‘जोश’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या उपस्थितीत आरंभ,गर्भाशयाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणारी एचपीव्ही लस सर्व नमुंमपा रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध

राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय…

🏥📊 आरोग्य कार्यक्रम अंमलबजवनी निर्देशकामध्ये गडचिरोली जिल्हा राज्यात तिसऱ्या स्थानी

गरोदरपणात महिलांच्या एचआयव्ही चाचणीसोबत काविळ चाचणीही प्राधान्याने व्हावी – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड*

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे ‘मच्छर ला टक्कर’ अभियानाची सुरुवात कीटकजन्य आजारांविरोधात भव्य जनजागृती चित्ररथ मोहीम

vishwatmaklokswamivarta