vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईचा सुपुत्र आणि आशियाई सुवर्णविजेता हॉकी गोलरक्षक सूरज करकेराचा उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते सत्कार

मुंबईचा सुपुत्र आणि आशियाई सुवर्णविजेता हॉकी गोलरक्षक सूरज करकेराचा उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते सत्कार

मुंबई, प्रतिनिधी : आशियाई क्रीडा स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या भारतीय हॉकी संघातील गोलरक्षक आणि मुंबईचा सुपुत्र सूरज करकेरा याच्या यशाचा मुंबईत विशेष गौरव करण्यात आला. विधान परिषदेचे उपसभापती तसेच ‘हॉकी मुंबई सिटी’चे अध्यक्ष सचिन अहिर यांनी विधान भवन येथील आपल्या दालनात सूरज करकेराची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा विशेष सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी उपसभापती सचिन अहिर यांनी सूरजच्या उत्कृष्ट गोलरक्षणाचे कौतुक करत संपूर्ण भारतीय हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. ‘हॉकी मुंबई सिटी’चे अध्यक्ष या नात्याने त्यांनी सूरज करकेरा याला ५० हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित केले. मुंबईच्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचवल्याचा सार्थ अभिमान या वेळी व्यक्त करण्यात आला.

या विशेष सत्कार समारंभास ‘हॉकी मुंबई सिटी’चे कोषाध्यक्ष शृंगार तारक राऊळ, अर्जुन पुरस्कार विजेत्या हेलन सोय (वेरी), आंतरराष्ट्रीय हॉकीपटू मनोरमा, तसेच संस्थेचे सभासद देवेंद्र कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

मुंबईत भुलेश्वर येथे गणेशोत्सव मंडळाची २२ फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी ५ लाख, तर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर

जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी 28 एप्रिल रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

राज्यात गुन्हेगारीत घट; न्याय व्यवस्थेत महाराष्ट्र आघाडीवर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची पारदर्शक व निष्पक्ष चौकशी होणार

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ-स्पर्धेचे आयोजन अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

कनेक्टिंग लिंकच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळलेल्या घटनेची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीसाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद-७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान वाशिम–बुलढाणा जिल्ह्यात ब्लॉक

vishwatmaklokswamivarta