vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

एकरकमी परतावा (OTS) योजना थकबाकीदार लाभार्थीनी योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे

एकरकमी परतावा (OTS) योजना थकबाकीदार लाभार्थीनी योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे

 रायगड-अलिबाग,द): प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य इतरमागासवर्गीय (ओबीसी) वित आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांची उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि., रायगड यांच्यामार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील लाभार्थीना स्वयंरोजगाराकरीता अल्पव्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. रायगड जिल्ह्यातील या महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थीनी “ओबीसी” महामंडळाच्या थकीत कर्जप्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (OTS) योजना दि.31 मार्च 2027 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि.अलिबाग गंगाधर डोईफोडे यांनी केले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी 28 एप्रिल रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

जिल्ह्यातील धरणे, जलसाठ्यांचे सप्टेंबरपर्यंत सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर जिल्हा कारागृहात बंदीवानांसाठी संगणक आणि सौर ऊर्जा प्रशिक्षण

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत ९ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ ! राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा ! – सनातन संस्थेचे आवाहन

जिल्ह्यातील होमस्टे, लॉजेस, स्टे रूम, बंगले व बेड अँड ब्रेकफास्ट सुविधांसाठी नियमावली लागू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta