vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अवैध सावकारी संदर्भात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

अवैध सावकारी संदर्भात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई, प्रतिनिधी: राज्यातील अवैध सावकारीला आळा बसावा आणि सावकारांच्या जाचातून शेतकरी व नागरिकांना सुलभ आणि जलद न्याय मिळावा यासाठी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले. राज्यातील अवैध सावकारीविरोधात शासनामार्फत करण्यात आलेल्या कारवाईचा तसेच प्रकरणनिहाय सद्यस्थितीचा आढावा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीत घेण्यात आला

विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार बच्चू कडू उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे अकोला, लातूर येथील जिल्हा उपनिबंधक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, अवैध सावकारीची प्रकरणे हाताळताना विशिष्ट आणि स्पष्ट निकष निश्चित करावे. सावकारी प्रकरणात शेतकऱ्याला सुलभ पद्धतीने न्याय मिळेल, याची दक्षता घ्यावी. जिल्हा उपनिबंधकांनी अशा प्रकरणांमध्ये गतीने निर्णय घ्यावेत, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

 

काही प्रकरणांमध्ये जमिनीचे व्यवहार वरकरणी रीतसर खरेदी-विक्रीचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात ते अवैध सावकारीशी संबंधित असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारचे गैरप्रकार रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक दक्षतेने कार्यवाही करावी, अवैध सावकारीसंदर्भातील प्रलंबित प्रकरणांचा तातडीने अहवाल मागवून ही प्रकरणे गतीने निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करावा.अवैध सावकारीला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या कार्यरत आहेत. या समित्यांना पोलीस प्रशासनाने आवश्यक ते सहकार्य करावे. विशेषतः दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अवैध सावकारीला वाव मिळणार नाही, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, असेही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ लागू झाल्यापासून अवैध सावकारीविरोधात तक्रारी, गुन्हे दाखल करणे,चौकशी तसेच सावकारीच्या व्यवहारातून बळकावलेल्या जमीन-मालमत्ता परत मिळवून देण्याची कार्यवाही सातत्याने सुरू आहे. मागील कालावधीत अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, सावकारीच्या व्यवहारातून बळकावलेली जमीन व इतर मालमत्ता संबंधितांना परत मिळवून देण्यात आली आहे. कारवाई अधिक प्रभावी आणि गतिमान करून अवैध सावकारीला आळा घालणे आणि शेतकरी व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे, याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे असेही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा न्यायालय रायगड, अलिबाग येथे ई-सेवा व नक्कल कॉपी केंद्राचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

इमाव, विमाप्र,विजा,भज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश 

मतदान शांततेत पार पडावे म्हणून जिल्ह्यात मनाई आदेश-7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta

मिरा-भाईंदरमधील वाढीव बांधकामांच्या नियमानुकूलतेसाठीपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा 3 सप्टेंबर रोजी पाहणी दौरा

vishwatmaklokswamivarta

महसूल कायदे व चॅप्टर प्रकरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण

शासनाच्या सर्व योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत-विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर