राजकीय दबावातून करण खरात यांना अटक केल्याचा आरोपभीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर यांची निष्पक्ष तपासाची मागणी
जालना/प्रतिनिधी-जळगाव (सोमनाथ) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा क्रमांक 323/2026 दाखल करण्यात आला आहे. मात्र, कोणताही ठोस पुरावा नसताना राजकीय व सामाजिक दबावातून करण मधुकर खरात यांना आरोपी करण्यात आल्याचा आरोप भीम आर्मीने केला आहे.
करण खरात हे मोलमजुरी करणारे असून त्यांचा या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजसह सर्व तांत्रिक पुराव्यांची सखोल तपासणी करून खऱ्या आरोपीवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनावर भीम आर्मीचे जालना जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर यांच्यासह जिल्हा सल्लागार एम. यू. पठाण यांच्यासह वरिष्ठ उपाध्यक्ष राम राजेभाऊ कदम, माजी सरपंच ब्रम्हानंद कदम, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आढाव, ज्ञानेश्वर कारभारी मोरे, नाथाजी कदम व भाऊसाहेब निवृत्ती कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.–0000