vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सेवा संकल्प अभियान’अंतर्गत नारायणखेड येथे बालकांच्या आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती

सेवा संकल्प अभियान’अंतर्गत नारायणखेड येथे बालकांच्या आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती

बुलढाणा, प्रतिनिधी : आयुष्यमान आरोग्य मंदिर, डिग्रस बु. अंतर्गत नारायणखेड येथे दि. ७ ऑक्टोबर रोजी नियमित आरोग्य सेवा सत्रासह वेलनेस ॲक्टिव्हिटी घेण्यात आली. आरोग्य सेवा संकल्प अभियान, ‘माझा गाव–आरोग्य संपन्न गाव’ तसेच ‘तिशीचा पल्ला–तपासणी व सल्ला’ अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला

यावेळी अंगणवाडीमध्ये अन्नप्राशन दिन साजरा करण्यात आला. ९ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीच्या अनुषंगाने लाभार्थी बालकांच्या पालकांना सहा महिन्यांनंतर पूरक आहाराची सुरुवात, सकस व संतुलित आहार, स्तनपानाचे महत्त्व, स्वच्छता व हात धुणे, बालकांची वाढ व विकास तसेच नियमित लसीकरणाबाबत आरोग्य शिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले.

नियमित आरोग्य सेवा सत्रात बालकांची आरोग्य तपासणी, वजन व वाढीचे निरीक्षण तसेच लसीकरणाची स्थिती तपासण्यात आली. बालकांना वयानुसार पौष्टिक व विविध आहार देणे, स्वच्छतेची काळजी घेणे आणि आरोग्यविषयक समस्या आढळल्यास तातडीने आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले.

या उपक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. उपक्रमाच्या माध्यमातून बालकांचे पोषण, आरोग्य, वाढ आणि सर्वांगीण विकास याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

प्राथमिक आरोग्य केंद्र सिंधी येथे NQAS राज्यस्तरीय मूल्यांकन संपन्न; आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर ‘NQAS’ टीमकडून समाधान

सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

आफ्रिकेच्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावांच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय इबोला विषाणू रोगाच्या बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

vishwatmaklokswamivarta

नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा द्याव्यात – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

जिल्हा आरोग्य संपन्न करण्यासाठी आरोग्य निर्देशांकांवर भर द्याजिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था व वैद्यकीय व्यावसायिकांनी ABDM अंतर्गत HFR व HPR नोंदणी करण्याचे आवाहन,डिजिटल आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आरोग्य संस्था व वैद्यकीय व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावरील नोंदणी आवश्यक