vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक दृष्टी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत चष्मेवाटप

सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक दृष्टी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत चष्मेवाटप

छत्रपती संभाजीनगर, द प्रतिनिधी) : सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक दृष्टी दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय, करमाड येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष नेत्रतपासणी व उपचार उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डोंगळीकर यांच्या सहकार्याने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) पथक, लाडसावंगी यांच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आरोग्य तपासणीदरम्यान पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करून त्यांना आवश्यक उपचार, संदर्भ सेवा व मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. पठाडे, दंतचिकित्सक डॉ. दहीवाळ आणि नेत्रचिकित्सा अधिकारी तुषार भालेराव यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली.या उपक्रमात आरबीएसके पथक, लाडसावंगी येथील डॉ. शरद राठोड, डॉ. मयुरा गोस्वामी, औषधनिर्माण अधिकारी प्रवीण मुंढे आणि आरोग्यसेविका सुनीता गाडेकर यांनी सहभाग नोंदविला.

संबंधित पोस्ट

जोखीमग्रस्त तालखेड गावात २१३ नागरिकांची मोफत एक्स-रे तपासणी

गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्धतेसाठी मानक कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश  

vishwatmaklokswamivarta

जिल्हा आरोग्य संपन्न करण्यासाठी आरोग्य निर्देशांकांवर भर द्याजिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

विशेष वृत्त:प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्यामाध्यमातून गर्भवती महिलांना मोठा दिलासा,जिल्ह्यात ३२ हजाराहून अधिक नवीन लाभार्थ्यांची नोंदणी

उन्हाळ्यातील वाढत्या तापमानात आरोग्याची काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

आयुष्यमान व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिम प्रभावीपणे राबवा; सर्व विभागाने समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन* २० मे ते ३० जून २०२६ या कालावधीत विशेष मोहीम..

vishwatmaklokswamivarta