vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट भारत-जपानच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नात्याची आकी आबे यांच्याकडून प्रशंसा

जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट-भारत-जपानच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नात्याची आकी आबे यांच्याकडून प्रशंसा

 

मुंबई, प्रतिनिधी: जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी वाराणसी आणि काशी येथील भेटीचे अनुभव सांगताना भारताच्या प्राचीन आध्यात्मिक परंपरा आणि जपानमधील धार्मिक प्रथांमधील विलक्षण साम्य अधोरेखित केले.वाराणसी हे भारतातील सर्वात प्राचीन आणि पवित्र शहरांपैकी एक असल्याचे नमूद करत, काशीजवळील एका आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी संस्कृत भाषेत म्हटली जाणारी प्रार्थना, पूजा-अर्चा आणि नैवेद्य अर्पण करण्याच्या पद्धती जपानमधील परंपरांशी मिळत्याजुळत्या असल्याचा अनुभव त्यांनी कथन केला. या साम्यामुळे भारत आणि जपान यांच्यातील सांस्कृतिक व आध्यात्मिक संबंधांची प्राचीनता आणि दृढता अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आकी आबे यांच्यासमवेत शिष्टमंडळ तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

विविधता ही भारताची सर्वात मोठी ताकद-राज्यपाल जिष्णु देव वर्मा‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत लोकभवन येथे आठ राज्ये व पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिन साजरासांस्कृतिक देवाणघेवाणीतून राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पॅनल पध्दतीने प्रथमत:च मतदान होत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्यापक जनजागृती

vishwatmaklokswamivarta

राज्य विधानसभा निवडणुका | दुपारी 1 वाजेपर्यंत अंदाजे मतदान टक्केवारी 📊 तामिळनाडू – 56.81% पश्चिम बंगाल (पहिला टप्पा) – 62.18% टक्के मतदान…

महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांसाठी सैन्य अग्निवीर भरती मेळावा, दिनांक 20 जुलै, 2026 पासून मुंब्रा, ठाणे येथे सुरू होणार आहे.

घाटकोपर भीमनगर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत बुद्धपौर्णिमा महोत्सव*बुद्धमूर्तीचा स्थापना सोहळा* 

सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा गौरव – मंत्री आदिती तटकरे यांची माहिती