vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील ८४८ एकर जमिनीच्या हद्द निश्चितीला गती द्या-राज्यमंत्री योगेश कदम भूमी अभिलेख विभागाला तातडीने मोजणी व सर्वेक्षण करण्याचे निर्देश..

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील ८४८ एकर जमिनीच्या हद्द निश्चितीला गती द्या-राज्यमंत्री योगेश कदम भूमी अभिलेख विभागाला तातडीने मोजणी व सर्वेक्षण करण्याचे निर्देश..

 

मुंबई, प्रतिनिधी : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील ८४८ एकर जमिनीच्या हद्द निश्चितीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित सोसायटीधारकांनी भूमी अभिलेख विभागाकडे तातडीने रीतसर अर्ज दाखल करावेत. हे अर्ज प्राप्त होताच संबंधित जागेची मोजणी व सर्वेक्षणाचे काम विलंब न लावता हाती घ्यावे, असे निर्देश गृह (शहरे) व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.या प्रक्रियेत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील या जमिनीच्या हद्द निश्चितीबाबत तसेच संबंधित प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.हद्द निश्चितीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यावर भर

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील ८४८ एकर जमिनीच्या सीमांकनासंदर्भातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधित सोसायटीधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर विभागाने जागेची मोजणी आणि सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश राज्यमंत्री कदम यांनी दिले. या प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही त्यांनी सूचित केले.

स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन कार्यवाही करण हद्द निश्चितीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन राबविण्यात येणार आहे. संबंधित नागरिकांचे सहकार्य घेऊन आवश्यक प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यात येईल, असे यावेळी राज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले

बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, महसूल विभागाच्या सहसचिव मनीषा जायभाये, पोलीस उपायुक्त (उत्तर विभाग-३) गजानन राजमाने, उपवनसंरक्षक किरण पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी नागनाथ रोहिले नगरसेवक वैभव भरडकर, तसेच उज्वला भगत, आत्माराम चाचे, अरुण सुर्वे, सुरेश यादव, राजेश सावरकर, शरद वाघ, गोपाळ सुतार आणि संदीप मसूरकर यांच्यासह संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

कॉकरोच जनता पार्टी’ नव्हे ‘कम्युनिस्ट जनता पार्टी’ *गोव्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (सीजेपी) आंदोलनात ‘हिंदुवाद मुर्दाबाद’च्या घोषणा; ‘सीजेपी’चा हिंदुविरोधी चेहरा पुन्हा उघड !आंदोलकांवर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी*

vishwatmaklokswamivarta

त्र्यंबक-नाशिकमध्ये सिंहस्थकुंभमेळा २०२७ चे आयोजन-कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताचे पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुंबईत पीएसएफएस व एएसयूएसई सर्वेक्षणाला प्रारंभनागरिक, लघुउद्योजकांना अचूक माहिती देण्याचे आवाहन

बारमाही पाणी व्यवस्थापनासाठी झऱ्यांचे पुनरुजीवन, संवर्धन आवश्यक,मृद व जलसंधारण सचिव गणेश पाटील 

vishwatmaklokswamivarta

मुंबई ठाण्यासह राज्यात दहीहंडी महोत्सव धुमधडाक्यात…

vishwatmaklokswamivarta

राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेची मर्यादा २ लाख रुपये करणार – मंत्री अतुल सावे ️ भिवडी येथे राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त इतर मागास बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांचे अभिवादन

vishwatmaklokswamivarta