vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त बुधवारी नियोजन बैठकआदिवासी, दलित, ओबीसींसह सर्व समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त बुधवारी नियोजन बैठकआदिवासी, दलित, ओबीसींसह सर्व समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

जालना/प्रतिनिधी

आदिवासी समाजाचे जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या नियोजनासाठी आदिवासी समाज विकास मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बुधवार, दि. 21 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही बैठक जालना येथील राजारामनगर, रेल्वे स्टेशन रोडवरील कृष्णा प्लाझा येथील माँ सेवाभावी संस्था कार्यालयात होणार आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या नियोजनासह विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

या बैठकीस आदिवासी, दलित, ओबीसी तसेच सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंचाचे संस्थापक अध्यक्ष गोकुळ स्वामी यांच्यासह बागेश्वर इंद्रोले, उज्वला साबळे, जयकिशोर गाजले, दीपक गुरवे, कामिनी कोडगट्टी, नरेश अन्टले, सचिन आनंदे, गणेश पवार, सतीश नाटेकर, रजिकांत बंडल्लु, अंगत कापरे, विनोद बोडले, अजय निलवंत, बाळकृष्ण कोत्ताकोडा, बाळासाहेब कपे, माणिक तोटे, रमेश पारेबलु व शिवाजी माळी यांनी केले आहे

संबंधित पोस्ट

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे गुरुवारी धरणे व निदर्शने आंदोलन

गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350 व्या शहिदी समागम सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात १८ मे अखेर ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा६४ गावे व २३० वाड्यांतील १ लाख १३ हजार ७०९ नागरिकांना दिलासा…

जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’व ‘यलो अलर्ट’ नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

फलटण येथे पालखी सोहळ्यात “चरण सेवा” उपक्रम; हजारो वारकऱ्यांना दिलासा-मुख्यमंत्री सहायता योजना व आरोग्य विभागाचा पुढाकार – फार्मसी विद्यार्थ्यांची सेवाभावाने सहभाग

आकाशवाणीच्या नव्वद वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्राच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉन सह विविध कार्यक्रमांचं आयोजन