vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत गेटवे ऑफ इंडिया येथे ऐतिहासिक भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत-गेटवे ऑफ इंडिया येथे ऐतिहासिक भेट

मुंबई, प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक पद्धतीने शाल पांघरून रुबियो यांचा सन्मान केला. तसेच, मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे प्रतीक असलेल्या गेटवे ऑफ इंडिया आणि परिसराची माहिती त्यांना दिली.भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात संवाद झाला. त्यानंतर दोघांनी गेटवे ऑफ इंडिया परिसराची पाहणी केली. या भेटीच्या माध्यमातून मुंबईच्या ऐतिहासिक वारशाची आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना करून देण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेशचंद्र, राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यासमवेत आलेले शिष्टमंडळ उपस्थित होते.

०००

संबंधित पोस्ट

जिल्हा विकास आराखड्यांतर्गत धोरणात्मक कामांसाठीजिल्हा वार्षिक योजनेतील 25 टक्के निधी राखीव ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न- सन 2026-27 साठी 676 कोटी 29 लाख रूपये नियतव्यय मंजूर – गत आर्थिक वर्षातील निधी जवळपास 100 टक्के खर्च

बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर , जळगांव तालुक्याला अवकाळी वादळी पावसाचा फटका…केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना विशेष लेख केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन: शाश्वत आणि रसायनमुक्त शेतीकडे खंबीर पाऊल…

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक-मतदार ओळखपत्र नसल्यास १२ पर्यायी कागदपत्रे चालणार

नमुंमपा निवडणूक निर्णय अधिकारी यांना धमकावणे ही गंभीर बाब – पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारापार्श्वभूमीवर आज (दि. २ जुलै) जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर