vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था व स्ट्राँग रूमची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून पाहणी*

*निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था व स्ट्राँग रूमची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून पाहणी*

 

गडचिरोली, प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी आज जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथील निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था आणि जिल्हा कोषागार कार्यालयातील स्ट्राँग रूमची पाहणी केली.आयटीआय येथे त्यांनी निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून साहित्य वाटपाच्या तयारीची माहिती घेतली. साहित्य वाटप सुरळीत होण्यासाठी नियोजन करण्याच्या तसेच परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या व सुरक्षा उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पंडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.त्यानंतर त्यांनी जिल्हा कोषागार कार्यालयातील मतपत्रिकांच्या सुरक्षित साठवणुकीसाठी असलेल्या स्ट्राँग रूमची सुरक्षा व्यवस्था तपासली.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी संजय त्रिपाठी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री जाधव, तहसीलदार संतोष आष्टीकर, यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून उदयास येणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

राज्यात ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पाण्याचे काटकसरीने नियोजन;अल-निनोच्या प्रभावामुळे दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाचा निर्णय

vishwatmaklokswamivarta

बाधितांच्या प्रश्नावर समन्वयाने मार्ग काढणार – जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड

vishwatmaklokswamivarta

श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मंत्री छगन भुजबळ

शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी पाच हजार रुपये जमा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणखी चाळीस तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश, परीक्षा शुल्क सरसकट माफ होणार

vishwatmaklokswamivarta

श्री सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण प्रकल्पामुळे परिसराला मिळणार नवे रूप – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री सिद्धिविनायक मंदिर परिसर सुशोभीकरणाचे भूमिपूजन