vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मानव-वन्यजीव संघर्षातून संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठीविशेष खबरदारी घेण्याचे वनविभागाचे आवाहन- अडचणीच्या वेळी वन विभागाच्या 1926 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

मानव-वन्यजीव संघर्षातून संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठीविशेष खबरदारी घेण्याचे वनविभागाचे आवाहन- अडचणीच्या वेळी वन विभागाच्या 1926 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

 सांगली, प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात सण-उत्सव आणि ऊसतोड हंगाम 2026-27 सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात, विशेषतः ऊसशेती व शेतशिवारात बिबट्या, रानगवा, कोल्हा, तरस यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर लक्षात घेता नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. मानव-वन्यजीव संघर्षातून होणारी संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी तसेच वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी नागरिक, शेतकरी, ऊसतोड कामगार, मुकादम आणि साखर कारखाना व्यवस्थापनाने वन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन उपवनसंरक्षक, सांगली वन विभाग यांच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, शेतकरी व शेतमजुरांनी पहाटे, संध्याकाळी आणि रात्री उशिरा शेतात एकट्याने जाणे टाळावे. शेतातील कामे शक्यतो समूहाने करावीत. शेतात जाताना टॉर्च किंवा इतर प्रकाशाची साधने सोबत ठेवावीत. बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात लहान मुलांना शेतात किंवा उसाच्या फडात एकटे सोडू नये. तसेच शेताच्या बांधावर किंवा उसाच्या शेतात झोळी बांधून बालकांना झोपवू नये. ऊसतोड कामगारांच्या वस्त्या उसाच्या शेतालगत न करता शक्यतो सुरक्षित व बंदिस्त ठिकाणी उभाराव्यात. वस्तीत पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी. शिल्लक अन्नपदार्थ व खरकटे उघड्यावर टाकू नयेत. त्यामुळे कुत्री व घुशी यांसारखे प्राणी आकर्षित होऊन त्यांच्या मागावर बिबट्यासारखे वन्यप्राणी वस्तीजवळ येण्याची शक्यता कमी होईल.

 ऊसतोड करताना उसाच्या फडात वन्यप्राणी किंवा त्यांची पिल्ले आढळल्यास ऊसतोडीचे काम तात्पुरते थांबवावे आणि सुरक्षित अंतर राखावे. वन्यप्राण्यांना दगड मारणे, पकडणे किंवा हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी तातडीने वन विभागाला माहिती द्यावी. वन्यप्राण्यांची शिकार करणे, सापळे लावणे, जाळी किंवा भाल्यांचा वापर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच नदी व तलावांमध्ये मगरींचा वावर असण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी मासेमारी किंवा आंघोळीसाठी पाण्यात उतरणे टाळावे. वन्यप्राण्यांच्या वावराबाबत समाजमाध्यमांवर जुने फोटो, व्हिडिओ किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये. केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.

वन्यप्राणी आढळल्यास किंवा मानवी-वन्यजीव संघर्षाची शक्यता निर्माण झाल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 वर त्वरित संपर्क साधावा.

मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलावीत

59 महसूल मंडळांत ‘महाराजस्व समाधान शिबिर; ‘एकाच ठिकाणी मिळणार सर्व लाभ’**संधीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन*

घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवा; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या गॅस वितरकांना सूचना• अवैध विक्री किंवा जादा दर आकारल्यास कारवाईचा इशारा

ठाण्यातील रिंग रेल्वेच्या मार्गातील बदलासाठी हिरानंदानी रोडज मधील रहिवाशांची मानवी साखळी मूक आंदोलन..

छत्रपती संभाजीनगर विभागात’ दर्जेदार कृषि निविष्ठा वेळेत मिळण्यासाठी भरारी पथके’ सज्ज

जिल्ह्यात ७३.६९ टक्के मतदारांचे मॅपिंगचे काम पूर्ण; मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश