vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विशेष लेख-वहागावच्या शेतकरीपुत्राने दुष्काळात दाखवली पशुपालकांसाठी दिशा

विशेष लेख-वहागावच्या शेतकरीपुत्राने दुष्काळात दाखवली पशुपालकांसाठी दिशा

कमी पावसाच्या आणि दुष्काळी परिस्थितीच्या झळा सोसणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पशुपालकांसाठी वाई तालुक्यातील वहागाव येथील प्रयोगशील शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी एक आशेचा नवा किरण दाखवून दिला आहे. नैसर्गिक संकटांवर मात करत शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या श्री. चव्हाण यांनी यंदाच्या दुष्काळी परिस्थितीतही अत्यंत हुशारीने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःच्या पशुधनासाठी वर्षभराच्या चाऱ्याची भक्कम सोय केली आहे.

श्री. पृथ्वीराज चव्हाण यांचा बंदिस्त शेळी आणि शेळी-मेंढी पालनाचा व्यवसाय आहे. सध्या संपूर्ण सातारा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी पशुधनाला वाचवणे आणि त्यांच्यासाठी हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करणे हे सर्वच पशुपालकांसमोर एक मोठे आव्हान ठरत होते. या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी श्री. चव्हाण यांनी उपायुक्त पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून त्यांच्याकडून शुगर गेज या विशेष ज्वारीच्या जातीचे बियाणे मिळवले.

त्यांनी आपल्या 6 एकर शेतजमिनीवर या शुगर गेज ज्वारीची पेरणी केली. अत्यंत अल्प पावसात आणि प्रतिकूल वातावरणातही या ज्वारीचे पीक अतिशय जोमाने आणि उत्तम प्रकारे आले आहे. शुगर गेज या जातीची पाण्याची गरज कमी असल्याने दुष्काळी भागातही हे पीक भरघोस उत्पादन देते. सध्याच्या पिकाची वाढ पाहता श्री. चव्हाण यांना त्यांच्या शेतातून एकरी अंदाजे 12 टन इतका मुबलक आणि पौष्टिक चारा उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला.

मिळालेल्या चाऱ्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी श्री. चव्हाण यांनी एक उत्तम नियोजन केले आहे. या चाऱ्यापासून ते शास्त्रोक्त पद्धतीने मुरघास तसेच सुका चारा तयार करणार असून अशा प्रकारे प्रक्रिया केलेला चारा वर्षभर टिकत असल्याने आणि त्याची पौष्टिकता टिकून राहत असल्याने, असेही त्यांनी सांगितले. शेळी-मेंढी पालनाच्या व्यवसायाला वर्षभर चाऱ्याची कोणतीही टंचाई भासणार नाही. दुष्काळातही त्यांच्या पशुधनाला हिरवा व पौष्टिक आहार अखंडपणे मिळत राहील, असा विश्वासही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.

आजच्या काळात शेती आणि पशुपालन करताना केवळ निसर्गावर अवलंबून न राहता योग्य नियोजन आणि योग्य वाणांची निवड करणे किती गरजेचे आहे, हे श्री. चव्हाण यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवले आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी श्री. चव्हाण यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा.

जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी देखील उपायुक्त पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून शुगर गेज ज्वारीचे बियाणे मिळवावे आणि आपल्या शेतात त्याची पेरणी करावी. निसर्गाच्या लहरीपणावर मात करून स्वतःच्या शेतातच चारा निर्माण केल्यास दुष्काळी परिस्थितीतही पशुधन सुरक्षित राहील आणि चाऱ्यांची उपलब्धता वाढण्याबरोबरच पशुपालनाचा व्यवसाय फायदेशीर ठरेल.

संकलन

जिल्हा माहिती कार्यालय,सातारा

0000

 

संबंधित पोस्ट

नरनाळा महोत्सवात रंगणार भव्य कवीसंमेलन

राज्यातील उद्योजकता आणि निर्यातीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित ‘महा निर्यात-इग्नाइट महाराष्ट्र कन्व्हेन्शन २०२६’ चा ठाणे जिल्हास्तरीय मेळावा संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राची तनु भान देशातील ‘सर्वोत्कृष्ट कॅडेट’ पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित

vishwatmaklokswamivarta

थ्री आर’ संकल्पनेंतर्गत इयत्ता नववी, दहावीचे सुस्थितीतील पाठ्यपुस्तक संच आदिवासी आश्रमशाळेला भेट

कारागृहातील बंदीवानांसाठी ‘सहाय्यक योग प्रशिक्षक’ कौशल्य प्रशिक्षणास प्रारंभ

रेवदंडा येथे ३० ऑक्टोबरपासून ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ दिवाळीनिमित्त स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांचे ४० हून अधिक स्टॉल्स; नागरिकांना स्वदेशी वस्तूंच्या खरेदीची संधी..

vishwatmaklokswamivarta