vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्री.चोक्कलिंगम यांनीठाणे जिल्हा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा घेतला आढावा..

अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्री.चोक्कलिंगम यांनीठाणे जिल्हा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा घेतला आढावा..

ठाणे, प्रतिनिधी: राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस चोक्कलिंगम यांनी आज ठाणे जिल्ह्याचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी मतदारयादी पुनरीक्षण मोहिमेच्या कामाची सविस्तर पाहणी केली आणि संबंधित यंत्रणेकडून आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती घेतली.

    या बैठकीस ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, कोकण विभागीय अपर आयुक्त फरोग मुकादम, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, विठ्ठल डाके, डॉ.धीरज चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने तसेच इतर संबंधित प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृष्यप्रणालीद्वारे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, कल्याण-डोंबिवली महानगर पालिका आयुक्त अभिनव गोयल, मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, तसेच संबंधित मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

                बैठकीदरम्यान बोलताना श्री. चोक्कलिंगम यांनी मतदार नोंदणी आणि पुनरीक्षण कार्यक्रमाचे काम अत्यंत पारदर्शकपणे आणि अचूकतेने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे तसेच मृत वा स्थलांतरित मतदारांची नावे कायदेशीर प्रक्रियेनुसार व नियमांचे तंतोतंत पालन करून वगळणे यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच, तरुण मतदारांची नोंदणी जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी यासाठी विशेष मोहीम राबवण्याबाबत त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. या महत्त्वाच्या मोहिमेत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी सर्व यंत्रणांनी आपापसात उत्तम समन्वय ठेवून विहित मुदतीत काम पूर्ण करण्याचे आवाहन केले.

00000000

संबंधित पोस्ट

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात’लेखापरीक्षक नेमणूकीसाठी निविदा सादर करण्‍याची मुदत 16 मे पर्यंत

डॉ. संजय लाखे पाटील यांची महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती*

महर्षी वाल्मिकी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांसाठी बातमी रविवारी नाही तर आज रात्री असणार मेगा ब्लॉक, NEET विद्यार्थ्यांना दिलासा

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेश स्पर्धापरीक्षा १ मार्च रोजी

vishwatmaklokswamivarta