vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पनवेलमध्ये ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेलमध्ये ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रायगड-अलिबाग, प्रतिन : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेच्या वतीने १७ ऑक्टोबर रोजी पनवेल शहरातील आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील प्रतिष्ठान, संघमित्र सोसायटी येथे आयोजित ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामुळे नवोदित लघुउद्योजकांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध झाली

महाराष्ट्र शासनाची ‘अमृत’ ही स्वायत्त संस्था असून, इतर मागासवर्गीय बहुजन विकास कल्याण अंतर्गत तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. या प्रशिक्षणातून तयार होणाऱ्या उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी आणि विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या व्यवसायाला चालना देणे तसेच उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देणे हा ‘अमृत पेठ’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यासोबतच शासनाच्या विविध योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ कसा घ्यावा, याबाबतही मार्गदर्शन केले जाते

या बाजारपेठेचे उद्घाटन आमदार विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत झाले. पनवेल शहर व परिसरातील अनेक मान्यवरांसह नागरिकांनी मित्रपरिवारासोबत बाजारपेठेला भेट देत विविध वस्तूंची खरेदी केली. सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुल्या असलेल्या या बाजारपेठेत विविध प्रकारच्या स्वदेशी उत्पादनांचे स्टॉल मांडण्यात आले होते.

यामध्ये घरगुती खाद्यपदार्थ, नवरात्रोत्सवासाठी सजावटीची तोरणे, इमिटेशन ज्वेलरी, दिवे, पणत्या, ड्रेस मटेरियल, विविध प्रकारच्या साड्या, धार्मिक वस्तू, घरगुती पिठे आणि पर्सेस अशा अनेक वस्तूंचा समावेश होता. नागरिकांनी खरेदीला चांगला प्रतिसाद दिल्याने स्टॉलधारकांच्या उत्पादनांची अपेक्षेप्रमाणे विक्री झाली.

उपक्रमाच्या यशाबद्दल स्टॉलधारकांनी समाधान व्यक्त केले. लघुउद्योजकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणे आणि त्यांच्या उत्पादनांची अपेक्षेप्रमाणे विक्री होणे, हे ‘अमृत पेठ’ उपक्रमाचे यश असल्याचे अमृतचे रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे आणि उपव्यवस्थापक मंगेश ढेबे यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी : www.mahaamrut.org.inसंपर्क :शैलेश मराठे, रायगड जिल्हा व्यवस्थापक – ९४२३८९२१८२मंगेश ढेबे, उपव्यवस्थापक – ८१४९५५२१४३

 

0000

 

संबंधित पोस्ट

सिपेट अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत ९ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ ! राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा ! – सनातन संस्थेचे आवाहन

एफसीआरए’ कायद्यातील सुधारणांवर संयुक्त संसदीय समितीची घोषणा-` परकीय निधी नियमन’ कायद्यातील सुधारणा विधेयकावर समितीचे कामकाज  शिवसेना खासदार नरेश म्हस्के `एफसीआरए’ कायद्यातील सुधारणांवरील समितीवर

vishwatmaklokswamivarta

अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त

ग्रामविकास भवनातून ग्रामीण प्रशासनाला मिळणार नवी दिशा – ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे ग्रामविकास भवनाच्या विविध सुविधांची पाहणी

सटवाई तांड्याच्या रहिवाशांच्या हक्कांसाठी मनसे आक्रमक; जागा नियमितीकरण, घरकुल मंजुरीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.