vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

बृहन्मुंबई हद्दीत 25 ऑक्टोबरपर्यंत जमावबंदी आदेश जारी..

बृहन्मुंबई हद्दीत 25 ऑक्टोबरपर्यंत जमावबंदी आदेश जारी..

            मुंबई, प्रतिनिधी : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 25 ऑक्टोबर 2026 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.

      या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, मिरवणूक काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, सांगितीय बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ आणि विवाह प्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे

      चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलीसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी आदेशान्वये कळविले आहे.

000

संबंधित पोस्ट

भारताच्या डिजिटल कौशल्य मोहिमेला गती देण्यासाठी “बढना है तो यहाँ जुडना है” या देशव्यापी मोहिमेचा, केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी ‘एस आय डी एच’ या कौशल्य भारत डिजिटल केंद्राच्या माध्यमातून केला शुभारंभ

यशकथा-उद्योजकतेकडे यशस्वी वाटचाल; जिद्दीच्या बळावर उभारला स्वतःचा उद्योग

ताडगाव येथे आदिवासी बहुउद्देशीय केंद्र, स्वर्गीय अजितदादा पवार उद्यान आणिअंगणवाडी केंद्राचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न,सुधागड तालुक्यात विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून विकासाचा सुंदर मिलापआदिवासी बांधवांसाठी सुविधांचे नवे दालन खुले

vishwatmaklokswamivarta

रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयांच्या विकासाला गती – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

सोगोडा शाळेत सेवा संकल्प अभियान उत्साहात सामाजिक बांधिलकी, देशभक्ती, पर्यावरण संवर्धन व आरोग्य जनजागृतीवर भर ; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

मुंबईचे तापमान ३६.३ अंश