vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

५१७ जणांच्या सामूहिक शंखनादाने नाशिकच्या नावे इतिहास; अमेरिकेचा ३०३ शंखवादकांचा विक्रम मोडला शंखनादाच्यापालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या मंगल पर्वाची आध्यात्मिक नांदी विश्वविक्रमाने दुमदुमला गोदाकाठ!

५१७ जणांच्या सामूहिक शंखनादाने नाशिकच्या नावे इतिहास; अमेरिकेचा ३०३ शंखवादकांचा विक्रम मोडला-शंखनादाच्यापालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या मंगल पर्वाची आध्यात्मिक नांदी विश्वविक्रमाने दुमदुमला गोदाकाठ!

नाशिक, प्रतिनिधी: “अभिनंदन! तुम्ही एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे!” गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी ही घोषणा करताच गोदावरीचा पवित्र तीर ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. अमेरिकेचा एकाच वेळी ३०३ जणांनी शंखनाद करण्याचा पूर्वीचा विक्रम मागे टाकत ५१७ व्यक्तींनी सामूहिक शंखनाद केल्याने नाशिकच्या नावे एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली. भक्ती, श्रद्धा, सामूहिक शक्ती आणि भारतीय संस्कृतीचा गौरव अधोरेखित करणाऱ्या या सोहळ्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या मंगल पर्वाची आध्यात्मिक नांदी ठरली.नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या पावन पर्वावर यशवंत महाराज पटांगण, गोदाकाठ येथे या सामूहिक शंखनादाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमात शंखनादाच्या निनादाने परिसरात चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले. गोदावरीच्या तीरावर एकाच वेळी घुमलेल्या शंखध्वनीने नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवित सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये उत्साह निर्माण केला.

या वेळी महापौर हिमगौरी आडके आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, नियोजन विभागाचे उपायुक्त योगेंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग, समन्वयक मिलिंद बेर्लेकर, अनंत विजय शंखनाद पथकाच्या वृषाली घोलप आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्यासह साधू-महंत, शंखनाद वादक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिकच्या यशाने महाराष्ट्राच्या लौकिकात भर

सामूहिक शंखनादाचा विक्रम प्रस्थापित झाल्यानंतर पालकमंत्री श्री. महाजन यांनी सहभागींचे मनःपूर्वक अभिनंदन केले. हा उपक्रम केवळ नाशिक किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, देशाच्या लौकिकात भर घालणारा आहे. अशा उपक्रमांमधून भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा आणि सामूहिक सहभागाची ताकद जगासमोर येते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

शंखनाद हा भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. मंगलकार्य, धार्मिक विधी आणि आध्यात्मिक उपासनेमध्ये शंखनादाला विशेष महत्त्व आहे. अशा परंपरेला विश्वविक्रमाची जोड देण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये साकार झाला. शेकडो नागरिकांनी एकाच वेळी शंखनाद करण्यासाठी दाखविलेली तयारी, शिस्त आणि उत्साह ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये ठरली. सर्व सहभागींचे योगदान कौतुकास्पद असल्याचे पालकमंत्री महाजन यांनी नमूद केले.

निर्धारित निकषांनुसार पडताळणी

कार्यक्रमादरम्यान गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी विश्वविक्रम नोंदविण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. एकाच वेळी सर्वाधिक व्यक्तींनी शंखनाद करण्याचा यापूर्वीचा विक्रम ३०३ व्यक्तींचा होता. तो मोडण्यासाठी निर्धारित नियमांनुसार त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी शंखनाद करणे आवश्यक होते. या उपक्रमासाठी ५०० हून अधिक जणांनी नोंदणी केली होती. सहभागींच्या नोंदी, प्रत्यक्ष सहभाग आणि निर्धारित निकषांनुसार केलेल्या कामगिरीची पडताळणी दोन निरीक्षकांकडून क⅚रण्यात आली.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  बालभवनच्या नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी केली.

हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्ष**24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणविषयक मोहिमेची कृषी क्षेत्राशी सांगड घालावी – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण

आर. जी. राजन यांच्या ‘मॅनेजमेंट म्युझिंग्स’ पुस्तकाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

टॉप क्लास स्कूल एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना; 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले

शासनाच्या सर्व योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत-विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर