vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्याकडून अलिबाग तालुक्यातील शाळा व अंगणवाड्यांची पाहणी; कुपोषित बालकांना योजनांचा लाभ देण्याचे निर्देश

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्याकडून अलिबाग तालुक्यातील शाळा व अंगणवाड्यांची पाहणी; कुपोषित बालकांना योजनांचा लाभ देण्याचे निर्देश

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी :- आदिवासी वाड्या-वस्त्यांमधील एकही पात्र लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. विशेषतः कुपोषित बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पोषण, आरोग्य व बालविकासविषयक योजनांचा लाभ वेळेत मिळवून द्यावा, असे निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिले.

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे हे दि. २६ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अलिबाग तालुक्यातील आदिवासी वाडी सांगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी आदिवासी समाजातील लहान मुलांशी संवाद साधत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडीचे महत्त्व पटवून दिले. बालकांनी नियमितपणे अंगणवाडीत जावे, तसेच त्यांना मिळणाऱ्या पोषण आहारासह विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.

या दौऱ्यात अध्यक्ष महेश ढवळे यांनी हाशिवरे येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच वाडगाव येथील प्राथमिक शाळा व अंगणवाडीला भेट देऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक परिस्थितीची माहिती घेतली. शाळा व अंगणवाड्यांमधून विद्यार्थ्यांना आणि बालकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांचा आढावा घेतला. तसेच संबंधित योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे की नाही, याची पाहणी केली.

शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. विशेषतः आदिवासी भागातील कुपोषित बालकांना आवश्यक पोषणविषयक सेवा आणि आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात. पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांना संबंधित योजनांचा लाभ मिळवून द्यावा. यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देशही अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिले.या पाहणी दौऱ्यावेळी शालेय शिक्षण विभाग तसेच महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

खेळाडूंना ५% आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली कार्यन्वित२४ तासांत डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन “देशाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने एक व्यापक राष्ट्रीय मिशन” असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिपादन

हिंदू खाटीक अर्थिक विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

नागपूर येथे भारतातील सर्वात मोठ्या तसेच अत्याधुनिक मल्टी – स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाचं भूमिपूजन. 

संत रविदासांच्या विचारांचा व्यापक अभ्यास, प्रसार होणे आवश्यक – मंत्री ॲड. आशिष शेलार ‘स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज ॲण्ड सोशल सायन्सेस’ने तयार केलेल्या संशोधन प्रकल्पाची केंद्र सरकारकडे तातडीने शिफारस करण्याचे निर्देश

झुडपी जंगलावरील जमिनीबाबत समन्वयाने कामाला गती द्या – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta