vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात २८ व २९ ऑक्टोबरला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता-हवामान अंदाजाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला

जिल्ह्यात २८ व २९ ऑक्टोबरला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता-हवामान अंदाजाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला

बुलढाणा, प्रतिनिधी : भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार, ‘अर्णब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बुलढाणा जिल्ह्यात २८ व २९ ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर ३० व ३१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या कालावधीत काही ठिकाणी आकाश मुख्यतः निरभ्र ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे

या संभाव्य हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकांची आणि काढणी केलेल्या शेतमालाची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामीण कृषी मौसम सेवा, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला : तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतमाल सुरक्षित आणि कोरड्या ठिकाणी साठवून ठेवावा. ओलीताखालील करडीची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत करता येईल. पेरणीपूर्वी बियाणे रात्रभर पाण्यात भिजवून घेतल्यास त्याची उगवण लवकर आणि चांगली होण्यास मदत होते. रब्बी पिकांची पेरणी करताना लवकर परिपक्व होणाऱ्या आणि पाण्याचा ताण सहन करू शकणाऱ्या वाणांची निवड करावी. एल निनो सदृश परिस्थिती लक्षात घेता, पाण्याची गरज कमी करण्यासाठी फळझाडांच्या सुकलेल्या, रोगट आणि अतिरिक्त फांद्या काढून टाकाव्यात. यामुळे उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यास मदत होईल.

जनावरांना केवळ वाळलेला चारा दिल्याने जनावरांच्या सर्व पोषणविषयक गरजा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे जनावरांचे वय, वजन, दूध उत्पादन आणि शारीरिक अवस्था लक्षात घेऊन आहाराचे नियोजन करावे. आवश्यकतेनुसार संतुलित पशुखाद्य, खनिज मिश्रण आणि मीठ द्यावे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार शेतीविषयक कामांचे नियोजन करून पिके, शेतमाल आणि पशुधनाची योग्य काळजी घ्यावी, असे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने सुचविण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या माध्यमातून दिव्यांगांना सेवा देऊन आत्मनिर्भर करणार – मुख्य सचिव राजेश अग्रवाल ‘दिव्यांग व्यक्तींच्या समावेशन व सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) क्षमता उलगडणे’ या विषयावर प्री-समिट राऊंडटेबलचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र” 2026 अतंर्गत आयोजीत रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जालना येथे 29 सप्टेंबरला रोजगार महाकुंभ; युवकांना रोजगाराच्या संधी…

vishwatmaklokswamivarta

चिखलीत निषेधाचा बुलंद आवाज! काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या अश्लाघ्य व बेताल वक्तव्याविरुद्ध तीव्र संताप:

आसाम रायफल्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांशी राज्यपालांचा संवाद

राज्य सेवा मुख्य परीक्षेसह तीन स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या

vishwatmaklokswamivarta

उष्णतेच्या लाटेबाबत जिल्हा प्रशासनाचा इशारा