vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय शालेय तलवारबाजी (14 वर्षाखालील मुले व मुली)  क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन उत्साहात संपन्ऩ

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय शालेय तलवारबाजी (14 वर्षाखालील मुले व मुली)  क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन उत्साहात संपन्ऩ

जालना, प्रतिनिधी: क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अधिनस्त़ क्रीडा व युवक सेवा, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालना व जिल्हा राज्य फेसिंग असोशिएशन यांच्या सहकार्याने राज्य़स्तर शालेय तलवारबाजी ( 14 वर्षाखालील मुले व मुली) क्रीडा स्पर्धाचे आयोजन दि. 29 ते 31 ऑक्टोबर 2026 कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे करण्यात आले आहेत.

 दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे राज्य़स्तर शालेय तलवारबाजी ( 14 वर्षाखालील मुले व मुली) क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल , यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी महापौर शहर महानगरपालिका, वंदना मगरे, प्रकाश काटोळे,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, उदय डोंगरे, सचिव, महाराष्ट्र राज्य फेसिंग असोशिएशन, विजय गाडेकर जिल्हा जालना तलवारबाजी असोशिएशन, जालना, राजकुमार सोमवंशी महारष्ट्र राज्य फेसिंग असोसिएशन कोषाध्यक्ष, जिल्हा क्रीडा संघटक, जालना संग्राम तारडे.जिल्हा जालना तलवारबाजी संघटना शिल्पा मोरे, तुषार आहेर, क्रीडा मार्गदर्शक तांत्रिक समिती सदस्य यांच्या उपस्थित संपन्न झाले.

खेळाडूंना शुभेच्छा देताना श्रीमती मित्तल, यांनी खेळाचा विकास साधण्यासाठी सरावात सातत्य असावे सराव करून खेळात प्राविण्य मिळवावे असे मनोगत व्यक्त केले. महापौर वंदना मगरे यांनी खेळ वाढवण्यासाठी खेळाडुनी मैदानवार उतरणे गरजेचे आहे.

   या स्पर्धेकरिता पंच प्रमुख डॉ.दिनेश वंजारे, सागर मगरे, अजय त्रिभवन, राहुल फडोळ, सौरभ तोमर, म्हणुन काम पाहत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नरेंद्र पवार , जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सिध्दार्थ कदम, क्रीडा अधिकारी लता लोंढे, आरती चिल्लारे, क्रीडा मार्गदर्शक, सचिन पुरी, आशिष जोगदंड, क्रीडा मार्गदर्शक, वरिष्ठ लिपीक अमोल मुसळे,कनिष्ठ लिपीक राहुल राठोड, राहुल गायके, विजय गाडेकर, संग्राम तारडे, उमेश गायकवाड , भरत चोरमारे अंनत झाल्टे, सुभाष पारे, विनायक किनकीन, रोहन वाघमारे , हारूण खान, इत्यादीनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमांचे सुत्रसंचलन यांनी आभार प्रदर्शन महमंद शेख, क्रीडा मार्गदर्शक यांनी केले.

संबंधित पोस्ट

ज्येष्ठ नागरिकांना मुंबईत छत्री वाटप

मिशन लक्षवेध’ अंतर्गत कुस्ती खेळाडूंची फेर निवड चाचणी; 6 मे रोजी आयोजन*इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज 30 एप्रिलपर्यंत सादर करावेत

इंडिया स्किल्स’ स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; ४ सुवर्ण पदकांसह एकूण १७ पदक केली प्राप्त कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले विजेत्यांचे कौतुक; इंडिया स्किल्सची आगामी स्पर्धा होणार मुंबईत

प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन 

गणेश विर्सजनाचे मिरवणूकीमध्ये डॉल्बी/डीजे साऊंड सिस्टीम, तीव्र क्षमतेचे लेझर बीम लाईटस्,स्नो स्प्रे आणि केमिकल स्प्रे यांचा वापर करण्यास प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी…

vishwatmaklokswamivarta