vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती : १० हजार ३२८ पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस मुलाखत व अध्यापन कौशल्य प्रक्रिया ३ ते २५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान होणार

पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती : १० हजार ३२८ पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस-मुलाखत व अध्यापन कौशल्य प्रक्रिया ३ ते २५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान होणार

मुंबई, प्रतिनिधी: पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ अंतर्गत खासगी शैक्षणिक संस्थांमधील १० हजार ३२८ रिक्त पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य प्रक्रियेसाठी शिफारस करण्यात आली आहे. या उमेदवारांची २७ हजार १५४ प्राधान्यक्रमांवरील शिफारस समाविष्ट असलेली नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह आणि राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ . नंदकुमार बेडसे यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मुलाखतीसह निवड प्रक्रियेसाठी खाजगी शैक्षणिक संस्थांच्या २ हजार ४१६ जाहिराती प्राप्त झाल्या होत्या. पदनिहाय शिफारशींमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या १ हजार ६०९ रिक्त पदांसाठी ४ हजार ४७८, इयत्ता सहावी ते आठवीच्या ४ हजार ५०५ पदांसाठी १० हजार ७९२ आणि इयत्ता नववी ते दहावीच्या ४ हजार २१४ पदांसाठी ११ हजार ८८४ प्राधान्यक्रमांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ ही ऑनलाइन परीक्षा २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. परीक्षेसाठी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी परीक्षा दिली, तर १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केले आहे.

पवित्र पोर्टलवर १ मे ते २० जुलै २०२६ या कालावधीत मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशा दोन्ही प्रकारांतील जाहिराती प्राप्त झाल्या. पात्र उमेदवारांकडून ६ ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्राधान्यक्रम घेण्यात आले. मुलाखतीसह निवड प्रकारात १ लाख ३१ हजार ५०५ उमेदवारांनी प्राधान्यक्रम निश्चित केले होते.

मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील शिफारशींबाबत उमेदवार आणि संबंधित व्यवस्थापनांना एसएमएसद्वारे माहिती दिली जात आहे. उमेदवारांना https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावरील लॉगिनमध्ये निवडीची स्थिती पाहता येईल. व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील ‘Download’ मेनूमध्ये उपलब्ध आहे.

शालेय शिक्षण विभागाने नियुक्ती प्राधिकाऱ्यांना २ एप्रिल २०२६ च्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य प्रक्रिया ३ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याशी संपर्क साधावा.

मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील तक्रारींच्या निवारणासाठी राज्यस्तरावर ‘तक्रार निवारण व दुरुस्ती समिती’ स्थापन करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी आपल्या तक्रारी विहित नमुन्यात edupavitra2025grcc@gmail.com या ई-मेलवर ७ नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

माजी सैनिकांसाठी ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण; 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान निवडणूक यंत्रणा सज्ज; २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी

vishwatmaklokswamivarta

शेतकरी व नागरिकांच्या जलप्रबोधनासाठीजलव्यवस्थापन कृती पंधरवडा दिशादर्शक- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- सांगलीत जल व्यवस्थापन व पीक पद्धतीवर कार्यशाळा उत्साहात 

vishwatmaklokswamivarta

अचूक मतदार यादीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी किशन जावळे**प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; नावांबाबत हरकती व दावे असल्यास सादर करावेत*

vishwatmaklokswamivarta

मनरेगाचा प्रलंबित निधी आठ दिवसांत उपलब्ध करून देण्याचे केंद्राचे आश्वासन रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या पाठपुराव्याला यश

सुसंस्कृत लातूरची ओळख जपूया, सामाजिक एकोपा वृद्धिंगत करूया-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड• यंदाही लातूर जिल्ह्यात ‘डीजे मुक्त’ गणेशोत्सव• बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या ‘डीजे’वर पोलीस गुन्हे दाखल करणार

vishwatmaklokswamivarta