vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अमरावतीच्या मातीतून धनुर्विद्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्र्यांच्या हस्ते स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या धनुर्विद्या मैदानाचे उद्घाटन,आंतरराष्ट्रीय धनुर्धर कुमकुम मोहोड यांची भेट घेऊन केला सत्कार

अमरावतीच्या मातीतून धनुर्विद्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्र्यांच्या हस्ते स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या धनुर्विद्या मैदानाचे उद्घाटन,आंतरराष्ट्रीय धनुर्धर कुमकुम मोहोड यांची भेट घेऊन केला सत्कार

अमरावती, प्रतिनिधी: कुमकुम मोहोड आणि यशदीप भोगे या धनुर्धरांसह, भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू भारती फुलमाळी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत केलेल्या उच्च दर्जाच्या कामगिरीमुळे अमरावतीला जागतिक बहुमान मिळाला आहे. स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेच्या धनुर्विद्या मैदानाहूनही असेच आंतरराष्ट्रीय स्तरावर या जिल्ह्याचे नाव झळकवणारे खेळाडू तयार होतील, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले. आंतरराष्ट्रीय धनुर्धर कुमकुम मोहोड यांची भेट घेऊन त्यांनी सत्कार केला.  येथील निंभोरा खुर्द भागात स्थित स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये नव्याने निर्मित धनुर्विद्या मैदानावर पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या उपस्थितीत शाळेच्या प्रशिक्षित तिरंदाज विद्यार्थ्यांनी नेम धरला व औपचारिकरित्या फित कापून धनुर्विद्या मैदानाचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे,आमदार सर्वश्री प्रताप अडसळ, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, अग्निहोत्री गृप ऑफ इन्स्टिट्यूटचे सचिव सचिन अग्निहोत्री, शाळेचे मुख्याध्यापक एन. संतोष कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

 पालकमंत्री श्री. बावकुळे म्हणाले शालेय स्तरावर उत्तमोत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्याने या क्षेत्रात पुढे जाण्याची दालन उघडतात. स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या धनुर्विद्या मैदानाहून प्रशिक्षित होऊन जागतिक दर्जाचे खेळाडू घडतील. नुकतेच आशियाई क्रीडा स्पर्धेत धनुर्विद्या खेळात अमरावतीच्या खेळाडूंचे यशाने ही बाब अधोरेखित झाल्याचे त्यांनी सांगितले. क्रीडा क्षेत्रातील उत्तम सुविधा व खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीने या जिल्ह्यातून येत्याकाळातही आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील असेही त्यांनी सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक एन. संतोष कुमार यांनी स्वागतपर भाषण केले तर अग्निहोत्री गृप ऑफ इन्स्टिट्यूटचे सचिव सचिन अग्निहोत्री यांनी प्रास्ताविक केले.

    या शाळेचे माजी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय धनुर्धर यशदीप भोगे यांचे प्रशिक्षक गणेश विश्वकर्मा यांच्या उपस्थितीत यशदीप यांचे वडील संजय भोगे यांचा यावेळी श्री. बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पालकमंत्र्यांनी केला धनुर्धर कुमकुम मोहोडचा सत्कार

      जपान येथे नुकत्याच आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या धनुर्धर कुमकुम मोहोड यांच्या साई नगर परिसरातील गोसावी कॉलनीत स्थित घरी जाऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचा सत्कार केला. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सर्वश्री प्रताप अडसळ, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, कुमकुम यांचे वडील अनिल मोहोड, आई रुपाली मोहोड आणि कुटुंबीय आदी यावेळी उपस्थित होते.         श्री. बावनकुळे यांनी यावेळी कुमकुम यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारल्या व तिरंदाजीतील त्यांच्या प्रवासाविषयी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील यशासह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील यशाबाबत माहिती जाणून घेतली. ऑलिम्पिक स्पर्धेतही कुमकुम यांनी यश मिळवून देशाचे नाव उज्ज्वल करावे अशा अपेक्षा व्यक्त करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

००००००

संबंधित पोस्ट

प्राण्यांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी चेकपोस्टवर भरारी पथकांनी तपासणी करावी-जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सीकत्तलखान्यास भेट देऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

समाजमाध्यमांमध्ये असत्य व अर्धसत्याचा महापूर; पत्रकारांनी ‘सत्य’ जनतेपर्यंत पोहोचवावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा छत्तीसगड व बिहारच्या पत्रकारांनी घेतली राज्यपालांची भेट

vishwatmaklokswamivarta

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा… सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगावॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मुंबईत पीएसएफएस व एएसयूएसई सर्वेक्षणाला प्रारंभनागरिक, लघुउद्योजकांना अचूक माहिती देण्याचे आवाहन

गणपती पुळे येथील दुर्घटनेतील मयतांच्या वारसांचा मदत वाटप

नववर्ष प्रण – सुरक्षित अन्न’ विशेष तपासणी मोहीम सुरू